गॅस वाहिनीच्या खोदकामामुळे 
नागरिकांच्या समस्येत वाढ

गॅस वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिकांच्या समस्येत वाढ

Published on

सोमाटणे, ता. १० ः गॅस वाहिनीसाठी केलेल्या खोदकामाचा रस्त्यालगत टाकलेल्या राडारोड्यामुळे सेवा रस्त्यावर पाणी साचले असून, रस्त्यावरून जाणे नागरिकांना कठीण झाले आहे.
गेल्या अडीच महिन्यांपूर्वी पुणे-मुंबई महामार्गालगत सोमाटणे चौकात रस्त्याखालून गॅस वाहिनी टाकण्यासाठी बस थांबा जागेलगत व सोमाटणे सेवा रस्त्यालगत असे दोन खड्डे खोदण्यात आले. हे खड्डे खोदताना निघालेले दगड, गोटे, मुरम संबंधितांकडून सेवा रस्त्यालगत टाकण्यात आले. गेल्या पाच दिवसांत पावसाचे पाणी या राडारोड्याने अडवल्याने सध्या सेवा रस्त्यावर पाण्याचे तळे तयार झाले असून तेथून जाणे नागरिकांना कठीण झाले आहे. या खड्ड्यालगतच्या रस्त्यालाच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. या शाखेत दररोज पवनमावळातील अनेकांना जावे लागते. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे बॅंकेत जाणे व पार्किंगमध्ये वाहने उभे करणे हे कठीण झाल्याने बॅंकेत जाणाऱ्या नागरिकांना वाहने दूरवर उभी करून पायी चालत जावे लागत आहे. शंभर फूट लांबीचे भुयार खोदण्यासाठी आज अखेर सत्तर दिवस झाले. तरीही गॅस वाहिनीचे काम अपूर्णच असल्याने सेवा रस्त्याने जाणारे नागरिक त्रस्त झाले असून, संबंधित कंपनीने हे काम जलद पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सेवा रस्त्यालगत हा खड्डा खोदल्याने दुचाकी घसरण्याचे प्रकार सुरू झाले असून, यातून अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.’’
- शेखर मुऱ्हे, स्थानिक नागरिक

खड्ड्यामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने शालेय विद्यार्थ्यांना यातून जाणे कठीण झाले आहे.’’
- हनुमंतराव मुऱ्हे, विद्यार्थी बसचालक

PNE24U31382

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.