मुक्तछंद, ओवी, सुंबरान, अभंगांची मेजवानी

मुक्तछंद, ओवी, सुंबरान, अभंगांची मेजवानी

Published on

पिंपरी,ता. १० ः मुक्तछंद, ओवी, पाळणा, गीत, गझल, पोवाडा, सुंबरान, अभंग अशा वैविध्यपूर्ण काव्यप्रकारांची मेजवानी ठरलेल्या भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवाला सर्व स्तरांतून उदंड प्रतिसाद लाभला.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. राज्यातील विविध जिल्ह्यांसह गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ राज्यांतील दोनशेहून अधिक कवींनी सहभाग घेतला. पिंपरीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे सुमारे दहा तासांहून अधिक काळ रंगलेल्या या महोत्सवात तीन वर्षे वयाच्या पूजा पाटील या चिमुरडीपासून ते वयाची ऐंशी वर्षे पार केलेल्या ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी या कवींनी वैविध्यपूर्ण काव्यप्रकार सादर केले.
कवी विजय वडवेराव यांच्या पुढाकारातून हा काव्य महोत्सवात आयोजित करण्यात आला. वडवेराव यांनी प्रास्ताविकामधून ‘भिडेवाडा बोलला’ या दीर्घ कवितेच्या लेखनामागील पार्श्‍वभूमी कथन केली. आजतागायत भिडेवाडा या विषयावर अनेक कवितांचे लेखन करण्यात आले आहे. सहभागी कवींनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख, वस्ताद लहुजी साळवे, मुक्ता साळवे यांच्या योगदानाचा अभ्यास केला. भावी काळात या चळवळीची व्याप्ती देशभरात किंबहुना विदेशातही विस्तारित करण्याचे उद्दिष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.