सीसीटीव्हीच्या अभावाने 
अपघाताची घटना उलघडेना
पिंपळे सौदागरमधील ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरण

सीसीटीव्हीच्या अभावाने अपघाताची घटना उलघडेना पिंपळे सौदागरमधील ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरण

Published on

पिंपरी, ता. १० : अपघात झालेल्‍या परिसरात सीसीटीव्‍ही नसल्‍याने पिंपळे सौदागर येथील ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणाची माहिती पोलिस प्रशासनाला मिळेनाशी झाली आहे. त्‍यामुळे तीन दिवस उलटूनही राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) पोलिस हवालदार सचिन विष्णू माने (वय ४३, रा. आदित्य अपार्टमेंट, मोशी) यांचा अपघातामध्ये मृत्यू कसा झाला, याची स्‍पष्टता होत नाही.
अपघातस्‍थळी अथवा त्‍या परिसरात सीसीटीव्‍ही असल्‍यास एखाद्या घटनेचा तपास त्वरित पूर्ण करता येतो. मात्र, पिंपळे सौदागर येथील अपघाताबाबत अनेक अडचणींचा सामना पोलिस प्रशासनाला करावा लागत आहे. रविवारी (ता. ७) रात्री पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाला. मात्र, नेमका तो कसा झाला? कोणत्‍या वाहनामुळे झाला, याची स्‍पष्टता होत नाही. या परिसरात सीसीटीव्‍ही नाहीत तसेच प्रत्‍यक्षदर्शीदेखील कोणी नव्‍हते. त्‍यामुळे पोलिसांना तपास करण्यात अडथळे येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.