नवरात्रोत्सवानिमित्त मोठा पोलिस बंदोबस्‍त

नवरात्रोत्सवानिमित्त
मोठा पोलिस बंदोबस्‍त
Published on

पिंपरी, ता. ३ : घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्‍या पार्श्वभूमीवर अनुचित घटना घडू नये, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्‍या वतीने मोठा बंदोबस्‍त ठेवण्यात आला आहे. ३ ते १२ ऑक्‍टोबर दरम्‍यान हा बंदोबस्‍त असणार आहे. पोलिस आयुक्तालय हद्दीतील सर्व पोलिस स्टेशन यांनी सर्व मंडळांच्या व शांतता समितीच्या बैठका घेतल्‍या आहेत. यामध्ये नवरात्रोत्सव उत्साहाने व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, त्या दृष्टीने सर्व सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिस आयुक्‍तांच्‍या सूचनेनुसार शहरात पोलिस सहआयुक्त, अप्‍पर पोलिस आयुक्त प्रत्‍येकी एक, सहा पोलिस उपआयुक्त, नऊ सहायक आयुक्त, ४८ निरीक्षक, २१० सहायक निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, २ हजार ५० पोलिस अंमलदार, पाचशे होमगार्ड, एक एसआरपीएफ कंपनी, दोन बीडीडीएस पथक, पाच आरसीपी, १७ स्ट्रायकिंग बंदोबस्त असणार आहे. सकाळी व सायंकाळी महिला छेडछाड होऊ नये, यासाठी ३४ दामिनी पथके कार्यरत राहणार आहेत. सर्व नागरिकांनी, मंडळाचे सदस्य, कार्यकर्त्यांनी दिलेल्‍या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com