मोबाईलच्या विखळ्यामधून बाहेर पडण्यास उपयुक्त

मोबाईलच्या विखळ्यामधून बाहेर पडण्यास उपयुक्त
Published on

पिंपरी, ता.३ ः मोबाईलच्या विळख्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी ‘सकाळ १० किमी रन’ ही स्पर्धा उपयुक्त ठरणार आहे. या स्पर्धेमुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी निश्‍चितच मदत होणार आहे. ‘सकाळ’च्‍या या उपक्रमात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी कुटुंबासह भाग घ्यावा, असे आवाहन शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी केले.
सकाळ माध्यम समूह आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने, पिंपळे सौदागर येथे १३ ऑक्टोबरला सकाळ १० किमी रन स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यासंदर्भात, ‘सकाळ’च्या पिंपरी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्यावेळी सेंट ॲन्ड्युज स्कूलचे क्रीडा प्रमुख व्यंकट रमण, श्री गुरू गणेश विद्यामंदिरचे प्राचार्य हनुमंत मारकड आणि न्यू सिटी प्राईड स्कूलचे उपप्राचार्य सचिन कळसाईत उपस्थित होते. या उपक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सहकार्य केले आहे. ‘सकाळ’च्या पिंपरी-चिंचवड आवृत्तीचे सहयोगी संपादक जयंत जाधव आणि वितरण विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ कुचकर यांनी स्वागत केले.

‘‘विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढविण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची आहे. आनंदी राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांसोबतच पालकांनी देखील ‘सकाळ १० किमी रन’ स्पर्धेत सहभागी होणे आवश्‍यक आहे. मुलांसोबत पालकांनी धावले पाहिजे.’’
- व्यंकट रमण, क्रीडा प्रमुख, सेंट ॲन्ड्युज स्कूल, चिंचवड

आरोग्याच्या जागरुकतेसाठी ‘सकाळ १० किमी रन’ स्पर्धा महत्वाची आहे. अन्य दैनिकांच्या तुलनेत ‘सकाळ’चे उपक्रम दर्जेदार असून लोकांसाठी नेहमीच उपयुक्त ठरतात. निरोगी राहण्यासाठी अशा स्पर्धेचे आयोजन होणे गरजेचे आहे.
- हनुमंत मारकड, मुख्याध्यापक, श्री गुरू गणेश विद्या मंदिर, निगडी


दैनंदिन कामाच्या व्यापात पालकांचे आणि अभ्यासाच्या अतिरिक्त ताणामुळे विद्यार्थ्यांचे व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. ‘सकाळ १० किमी रन’ स्पर्धेमुळे मुलांना व्यायामाची सवय लागण्यास मदत होईल.’’
- सचिन कळसाईत, उपमुख्याध्यापक, न्यू सिटी प्राईड स्कूल, पिंपळे सौदागर

सकाळ मॅरेथॉन बैठक
51243

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com