धार्मिक ध्रुवीकरणाची पद्धत अवलंबणे बंद करावी : डंबाळे

धार्मिक ध्रुवीकरणाची पद्धत अवलंबणे बंद करावी : डंबाळे
Published on

पिंपरी, ता.३ ः ‘‘राजकीय पक्षांनी धार्मिक ध्रुवीकरणाची पद्धती अवलंबणे बंद करावे. धार्मिक स्थळांवर कारवाई करताना महापालिकेकडून भेदभाव केला जात आहे. शहरांमध्ये सर्वच धर्मीयांची बहुतांश प्रार्थना स्थळे अनधिकृत बांधलेली आहेत. अशा प्रकारच्या प्रार्थना स्थळांवर कारवाई करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने व मुंबई उच्च न्यायालयाने वेळोवेळी निर्देश दिलेले असतानाही अशा प्रकारे महापालिका कारवाई करत आहे.’’, असा आरोप नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत गुरुवारी (ता. ३) केला.
नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्यावतीने मुस्लिम समाज प्रतिनिधींची संयुक्त बैठक आयोजित केली होती. बैठकीत नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, युसुफ कुरैशी, शाकीर शेख, हाजी गुलाम रसुल, इम्रान शेख, कारी इक्बाल उस्मानी, मौलाना उमर गाझी, मौलाना नय्यर नुरी, मुनाफ तरासगर आदी उपस्थित होते.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला संघटनेकडून विरोध करण्यात येत असून या संदर्भामध्ये सुमारे १८ राज्यांमध्ये जनजागृती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. आज अखेरपर्यंत तब्बल १ कोटी ३० लाख पेक्षा अधिक मुस्लिम समाज बांधवांनी हे विधेयक रद्द करावे, अशी मागणी संयुक्त संसदीय समितीकडे केलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com