गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त
Published on

जुन्या भांडणामधून एकाला मारहाण

पिंपरी : मागील वर्षी नवरात्रामध्ये झालेल्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. ही घटना नेहरूनगर, पिंपरी येथे घडली. या प्रकरणी नितीन नारायण शिंगाडे (रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुजल बनपट्टे (वय २०, रा. निगडी), रोहित जाधव (वय २८, रा. पिंपळे गुरव), अक्षय शिंदे (वय २६, रा. पिंपळे गुरव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांचे घरी जात होते. त्यावेळी संतोषी माता चौक नेहरूनगर येथे आल्यानंतर आरोपींनी त्यांना अडवून बेदम मारहाण केली.

भंगारवाल्याला लुटले
चिखली : भंगारवाल्याला दोन अनोळखी व्यक्तींनी पोलिस असल्याची बतावणी करून लुटले. कोयत्याचा धाक दाखवून त्याचा गुगल पे चा पासवर्ड घेऊन ५१ हजार रुपये ट्रान्सफर केले. ही घटना जाधववाडी, चिखली येथे घडली. या प्रकरणी रामसेवक तिहुल सहानी (रा. चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी व्यक्तींवर दाखल झाला आहे. फिर्यादी हे भंगार जमा करण्याचे काम करतात. द्वारकानगरी सोसायटी जवळ भंगार जमा करून झाल्यानंतर ते पदपथावर बसले होते. त्यावेळी दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती तिथे आले. त्या व्यक्तींनी ते पोलिस असल्याचे फिर्यादीस सांगितले. त्यांना कोयत्याने मारहाण करुन त्यांच्या गुगल पेचा पासवर्ड घेत त्यांच्या खात्यावरून ५१ हजार दोनशे रुपये वेगवेगळ्या खात्यांवर ट्रान्सफर करून घेतले.


सूसमध्ये तिघांना बेदम मारहाण
पिंपरी : सोसायटीलगत असलेले गवत काढत असताना थांबविल्याने तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सूस येथे घडली. या प्रकरणी सोमनाथ नागनाथ गुंड (रा. सुस) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, यशवंत शंकरराव निम्हण, ऋषिकेश यशवंत निम्हण, अभिषेक यशवंत निम्हण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हे तीर्थ टॉवर या सोसायटी लगत असलेले गवत काढत होते. त्यांना ते काम थांबविण्यास सांगितले असता आरोपींनी भरत पासी यांच्या अंगावर बुलडोझर घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांना बेदम मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या वासू कुनीचेट्टी यांनाही बेदम मारहाण केली.


तोतया पोलिसांनी वृद्धास लुटले
रावेत : पोलिस असल्याची बतावणी करत एका वृद्ध व्यक्तीचे दागिने घेऊन चौघेजण पसार झाले. ही घटना चंद्रभागा कॉर्नर जवळ रावेत येथे घडली. या प्रकरणी चंद्रकांत पांडुरंग नायक (रा. चंद्रभागा कॉर्नरजवळ, रावेत) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चार अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. दोन दुचाकीवरून चार अनोळखी व्यक्ती फिर्यादीजवळ आले. त्यांनी फिर्यादी यांना पोलिस असल्याची बतावणी केली. हातचलाखी करून फिर्यादी यांच्याकडील सोनसाखळी आणि अंगठी घेऊन त्यांची ८५ हजारांची फसवणूक केली. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून पसार झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com