विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीमधील मानांकन अभिमानास्पद

विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीमधील मानांकन अभिमानास्पद

पिंपरी, ता. ११ ः ‘‘राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या शाळांतील १६ विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर मानांकन मिळविले असून ही बाब अभिमानास्पद आहे,’’ असे कौतुकोद्‍गार आयुक्त शेखर सिंह यांनी काढले.
इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये १३२ विद्यार्थी पुणे जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यापैकी १६ विद्यार्थी हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांतील आहेत. उर्दू शाळा आकुर्डी, उर्दू शाळा रुपीनगर, उर्दू शाळा थेरगाव, उर्दू शाळा खराळवाडी, उर्दू शाळा चिंचवड, उर्दू शाळा जाधववाडी, उर्दू शाळा लांडेवाडी, मुलांची शाळा मोशी, उर्दू शाळा दापोडी, उर्दू शाळा नेहरूनगर, मुलींची शाळा दिघी, अण्णासाहेब मगर माध्यमिक शाळा पिंपळे सौदागर या महापालिकेतील शाळांतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरावर गुणवत्ता यादीत आले आहेत.
या विद्यार्थ्यांना राज्य परीक्षा परिषदेच्या प्रमाणपत्रासह दहा महिन्यांसाठी अनुक्रमे ५०० रुपये प्रति महिना आणि ७५० रुपये प्राप्त होणार आहे. गतवर्षीप्रमाणेच यावर्षी जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांसाठी देखील सहलीचे नियोजन करण्यात आले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षांमधील आमच्या विद्यार्थ्यांचे यश हे महापालिकेच्या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता अधोरेखित करते. जास्तीत जास्त उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका


शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालावरून शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आमचे सतत प्रयत्न दिसून येतात. शिष्यवृत्ती निधी हे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात खूप मदत करेल.
- विजय कुमार थोरात, सहाय्यक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com