

पिंपरी, ता. ३ ः महापालिकेने बांधलेल्या घरकुल योजनांमधील सदनिकांची अनेकदा विक्री होत नाही. त्यांची नोंद महापालिकेच्या कर आकारणी पुस्तकात संबंधित बांधकाम व्यावसायिक, विकसक संस्था आणि मालक यांच्या नावे केली जाते. अशा मालमत्तांची प्रथम विक्री झाल्यानंतर प्रथम खरेदीदारांच्या नावे आकारणी पुस्तकात हस्तांतरण नोंद कार्यवाही करताना हस्तांतर शुल्क आकारणी केली जाणार नाही, असा निर्णय महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी गुरुवारी घेतला.
महापालिकेच्या आर्थिक नियोजनासाठी वित्तीय उपाययोजना आणि वित्तीय धोरणे निश्चित करणे, शहरातील मालमत्ता हस्तांतरण शुल्क आकारणीमध्ये सवलत देणे, यासह विविध विषयांना महापालिका सर्वसाधारण सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असते. त्यामुळे सर्व विषयांचे प्रस्ताव गुरुवारच्या विशेष सभेसमोर ठेवले होते. त्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयानुसार, महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत महापालिका हद्दीतील मालमत्तांवर मालमत्ता कराची आकारणी व वसुली करण्यात येते. महाराष्ट्र राज्य महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्तांच्या आकारणी पुस्तकात नोंदी घेण्यात येतात. बांधकाम व्यावसायिक, पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास महामंडळ, महापालिका आणि राज्य सरकार यांच्यामार्फत होणाऱ्या घरकुल योजनांमधील मालमत्ता विक्रीसाठी बांधलेल्या असतात. त्या विक्री झाल्या नसल्यास कर आकारणी पुस्तकात संबंधित बांधकाम व्यावसायिक, तसेच विकसक संस्था व मालकांच्या नावे नोंदवण्यात येतात. अशा मालमत्तांची प्रथम विक्री झाल्यानंतर प्रथम खरेदीदारांच्या नावे आकारणी पुस्तकात हस्तांतरण नोंद कार्यवाही करताना अशा प्रकरणी हस्तांतर शुल्क आकारणी केली जाणार नाही.
बैठकीत मंजूर विविध विषय
- महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी अत्यावश्यक अत्याधुनिक साहित्य खरेदी
- आरोग्य निरीक्षक पदाच्या सेवा, प्रवेश नियमामध्ये नेमणुकीच्या टक्केवारी व अर्हतेमध्ये बदल
- आयटूआरनुसार ताब्यात आलेल्या चिंचवडमधील जागेवर आयटीआय इमारत उभारण्यासाठी वास्तुविशारद नेमणूक करणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.