‘रोटरॅक्ट क्लब’ तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
पिंपरी, ता. ४ ः चिंचवड येथील जयवंत भोईर शाळेत रोटरॅक्ट क्लब बाणेरतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. क्लबचे अध्यक्ष दैविक कारिया यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून यंदाच्या गणेशोत्सवात क्लबच्या सदस्यांतर्फे सर्वत्र देवदर्शनासाठी आलेल्या नागरिकांना पैसे, मिठाई किंवा फळ यापेक्षा शालेय साहित्य देण्याचे आवाहन केले होते. नातेवाईक, मित्रपरिवार, रहिवासी सोसायटी, गणेशोत्सव मंडळे आदी ठिकाणांहून सुमारे तीन हजार वह्या, पुस्तके व लिखाण साहित्य संकलित झाले. रोटरॅक्ट क्लब सदस्यांनी शाळेचे मुख्याध्यापक रावत यांच्या उपस्थितीत ५०० वह्या, पुस्तके आणि लेखन साहित्य विद्यार्थ्यांमध्ये वितरित केले.
हा संपूर्ण उपक्रम रोटरॅक्ट क्लब बाणेर आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ सेलेस्टिअल्स, रोटरॅक्ट क्लब ऑफ एसएसपीयू, रोटरॅक्ट क्लब ऑफ पिंपरी एलिट आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ ह्युमॅनिटसच्यावतीने राबविण्यात आला. याप्रसंगी रोटरॅक्ट क्लबचे सदस्य शुजान सय्यद, मैत्रेयी भावे, विराज वैशंपायन, हर्षवर्धन शेलार, मिहीर मुळे, मयूरी चव्हाण आणि आदित्य पांचाळ आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

