

पिंपरी, ता. ५ ः निगडी ते पिंपरी या मार्गावर मेट्रोचे काम सुरू असून यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारले आहेत. त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. अशातच यामार्गावर अनेक वाहन चालक बेशिस्तरित्या वाहने उभी करतात. यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहनांची वर्दळ असते. निगडीपासून पुण्यापर्यंतच्या मार्गावर वाहनांची संख्या आणखी वाढते. अशातच निगडी ते पिंपरी या मार्गावर मेट्रोचे काम सुरु असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यासह सेवा रस्त्यावरही वाहनांची गर्दी होते. दरम्यान, या रस्त्यावर बेशिस्तरित्या वाहने उभी केल्यास वाहतूक कोंडीमध्ये भर पडते. निगडीतील भक्ती-शक्ती चौक परिसर, दिवंगत मधुकरराव पवळे उड्डाणपूल परिसर, बजाज गेट समोर, खंडोबा माळ चौक परिसर, काळभोरनगर भुयारी मार्ग या भागातील रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. तसेच, प्रवासी घेण्यासाठी बॅरीकेड्सला लागूनच रिक्षाही उभ्या केलेल्या असतात. सेवा रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनांना रस्ता शिल्लक राहत नसल्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे बेशिस्त नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी होता आहे.
निगडी ते पिंपरी या मार्गावर मेट्रोचे काम सुरु असल्याने बॅरिकेड्स उभारलेले आहेत. यामुळे रस्ता काहीसा अरुंद झाला आहे. दरम्यान, या मार्गावर इतर वाहने उभी राहिल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशाप्रकारे बेशिस्तरित्या रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर सतत कारवाई केली जात आहे. वाहन चालकांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे.
- रूपाली बोबडे, पोलिस निरीक्षक, निगडी वाहतूक विभाग.
निगडीतील उड्डाणपुलापासून पुण्याच्या दिशेने वळण घेतल्यानंतर मेट्रोच्या कामासाठी बॅरिकेड्स उभारलेले आहेत. मात्र, याच बेरिकेड्सलगत इतरही खासगी वाहने उभी असतात. या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. वादाच्या घटनाही घडतात. तरी या बेशिस्त वाहन चालकांवर पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
- विकास पागिरे, नागरिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.