मालमत्तेबाबत हरकतींचा 
निपटारा होणार जलद 
‘क्यूआर कोड’चा वापर करण्याचे करसंकलन विभागाचे आवाहन

मालमत्तेबाबत हरकतींचा निपटारा होणार जलद ‘क्यूआर कोड’चा वापर करण्याचे करसंकलन विभागाचे आवाहन

Published on

पिंपरी, ता. ५ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत शहरात सर्वच मालमत्तेचे सर्वेक्षण सुरू आहे. त्या अंतर्गत नव्याने निदर्शनास आलेल्या मालमत्तांना विशेष नोटीस वाटप करण्यात येत आहे. ज्या मालमत्ताधारकांना आपल्या नोटिसवर हरकती नोंदवायच्या असतील, त्यांनी नोटिसवर दिलेल्या ‘क्यूआर कोड’द्वारे ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्‍या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून करण्यात आले आहे. हरकतीवर सुनावणीची प्रक्रिया जलद गतीने करण्यात येणार असल्‍याची माहिती विभागाने दिली आहे.
शहरातील सर्व प्रकारच्या मालमत्तांचे, कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत मालमत्ता सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये ८ लाख ५५ हजार १०२ मालमत्तांना सलग अनुक्रमांक (जिओ सिक्वेन्सिंग) देण्यात आले आहे. ५ लाख ३२ हजार ३०७ मालमत्तांचे अंतर्गत मोजमाप करण्यात आले आहे. मालमत्ता सर्वेक्षणांतर्गत करण्यात आलेल्या मोजमाप प्रक्रियेमध्ये नव्याने निदर्शनास आलेल्या मालमत्तांपैकी ५२ हजार ७८७ मालमत्तांपर्यंत विशेष नोटीस एकचे वाटप करण्यात आले आहे. ज्या मालमत्ताधारकांना विशेष नोटीस एक प्राप्त झाल्यानंतर नोटीस अमान्य असल्यास हरकत दाखल करण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी अशा हरकतींबाबत आवश्यक कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीनेच पूर्तता करून हरकतीवर सुनावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष नोटीस प्राप्त झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत वरील हरकती असतील तर; त्या दाखल करणे आवश्यक असणार आहे, असे आवाहन करसंकलन विभागामार्फत करण्यात आले आहे.

तीन महिन्यांपर्यंत विविध सवलती
ज्या मालमत्तांची चालू वर्षी नव्याने आकारणी झाली आहे, अशा मालमत्तांना बिल लागू झाल्यापासून तीन महिन्यांपर्यंत विविध सवलतींचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये मालमत्ताधारकांनी आगाऊ कर भरल्यास ५ टक्के तर ऑनलाइन स्वरूपात कर भरल्यास ५ टक्के, महिलांच्या नावे असलेल्या एका निवासी घरास ३० टक्के, दिव्यांग व्यक्तींच्या नावे असलेल्या मालमत्तेस ५० टक्के, झिरो वेस्ट आणि ‘एसटीपी प्लॅंट’ कार्यान्वित असल्यास १० टक्के, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास २ टक्के, ग्रीन बिल्डिंग रेटिंगमध्ये ३ ते ५ रेटिंग असणाऱ्या मालमत्तांना ५ ते १० टक्क्यांच्या सवलतींचा लाभ घेता येणार आहे.


‘‘पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागामार्फत शहरात सर्वच मालमत्तेचे सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षणांर्गत नव्याने निदर्शनास आलेल्या मालमत्तांना विशेष नोटीस १ वाटप करण्यात येत आहे. ज्या मालमत्ताधारकांना आपल्या नोटिसवर हरकती नोंदवायच्या असतील, अशा मालमत्ताधारकांनी नोटिसवर दिलेल्या ‘क्यूआर कोड’द्वारे ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करावी.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक.
फोटोः 52199

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com