पिंपरी-चिंचवडमध्ये २५ ठिकाणी विजयादशी उत्सव
वाकड, ता. ५ : पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे रविवारी (ता. ६) विविध भागांत १७ ठिकाणी; तर १२ व १३ ऑक्टोबर रोजी दहा ठिकाणी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध २७ भागांत मोठ्या संख्येने स्वयंसेवक आणि नागरिक या उत्सवात सहभागी होणार आहेत. यावेळी घोष प्रात्यक्षिके, गीत गायन या सामुहिक कार्यक्रमांसह पारंपरिक शस्त्रपूजन, अनुभवी वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचबरोबर १२ ऑक्टोबर रोजी विविध भागांत पथसंचलनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन संघाचे पिंपरी-चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी केले आहे.
विविध भागांतील कार्यक्रम, ठिकाण, वेळ व वक्ते पुढील प्रमाणे - देहू : भैरवनाथ चौक, चिंचोली, देहू, वक्ते - शैलेश कुळकर्णी, दुपारी ४.३०; निगडी : मॉडर्न शैक्षणिक संकुल, यमुनानगर, वक्ते - सचिन ढोबळे, निगडी, सायं ६; चिखली : जगदगुरू संत तुकाराम महाराज सभागृह, टाऊन हॉल, वक्ते - रघुनाथ देविकर, सायं. ५:३०; सांगवी : संत तुकारामनगर, पंडित दीनदयाळ उपाध्याय मनपा शाळा, वक्ते - जयदीप धर्माधिकारी, सायं.६; कासारवाडी : ज्ञानेराज माध्यमिक शाळा मैदान, शास्त्रीनगर, वक्ते : चंद्रशेखर लिमये, सायं ५.३०; पिंपळे गुरव : रामकृष्ण मंगल कार्यालय, वक्ते : नागेश पाटील, दुपारी ४.३०; सांगवी : संस्कृती मंगल कार्यालय, शितोळे पेट्रोल पंपाजवळ, नवी सांगवी, वक्ते : धनंजय चंद्राद्रे, सायं.६.३०; पिंपळे निलख : चोंढे-पाटील क्रीडा संकुल, विशालनगर, वक्ते - मुकुंद कुलकर्णी, प्रमुख अतिथी - आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, सायं ५.४५ वाजता; काळेवाडी-रहाटणी : ज्योतिबा उद्यान वाहनतळ, पवनानगर, वक्ते - शेखर पंडित सायं.५.३०; पिंपरी : नवमहाराष्ट्र विद्यालय, वक्ते - नरेंद्र पेंडसे, सकाळी ८; चिंचवड पूर्व : स्व.जिजाबाई गावडे उद्यान, वक्ते - अविनाश भेगडे, सायं.५.३० वाजता; रावेत : शुभम गार्डन, वाल्हेकरवाडी, वक्ते : अतुल अग्निहोत्री, सायं ५.३०; वाकड : रिलायन्स मॉल समोर, वक्ते - प्रसाद पेशवे, सायं.५.३०; पुनावळे : बालाजी विद्यापीठ, वक्ते : दिलीप कंद सायं.५; थेरगाव : बिर्ला हॉस्पिटल रोड, गंगा आशियाना सोसायटी समोरील मैदान, वक्ते : विलास पवार, सायं ५. ३०; हिंजवडी : ब्ल्यू रिज पब्लिक स्कूल, वक्ते - दत्तात्रेय घाणेकर, सायं.५.३०; आकुर्डी : सावरकर मैदान, संत तुकाराम महाराज बागेजवळ, वक्ते : उमेश कुटे, सायं.५.३०.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

