उद्योजक, कामगारांच्‍या 
आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर
भोसरी एमआयडीसी परिसरात कचऱ्याचे ढीग

उद्योजक, कामगारांच्‍या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर भोसरी एमआयडीसी परिसरात कचऱ्याचे ढीग

Published on

पिंपरी, ता. ६ : पिंपरी-चिंचवड, भोसरी उद्योजक, कामगारांच्‍या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. औद्योगिक परिसरात कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहे. परिणामी डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. साथीचे आजार पसरतील, अशी भीती व्‍यक्‍त होत आहे. त्‍यामुळे या परिसरातील कचरा वेळेत उचलावा, अशी मागणी उद्योजकांमधून होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील औद्योगिक पट्ट्यातील कचऱ्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. कचरा वेळेत उचलण्याबाबत सातत्‍याने उद्योजक, कामगार पाठपुरावा करत आहेत. महापालिकेकडे दहा वर्षांपासून वेळेत कचरा उचलण्यासाठी परिसरातील कंपन्यांकडून पाठपुरावा केला जात आहे. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे. ‘एमआयडीसी’त कचरा साचविण्यासाठी यापूर्वी मोठ्या कचरा कुंड्या होत्या; पण, आता त्‍याही नाहीत. ओला-सुका कचरा कंपन्यांमध्ये साचून राहतो आहे. परिणामी आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात डेंगी, चिकनगुनिया आदी आजारांचे थैमान वाढत आहे. त्‍यामध्ये औद्योगिक परिसरातील कचऱ्यांची भर पडत आहे. हा कचरा वेळेत उचलण्याबाबत उद्योजक मागणी करत आहेत.

‘‘शहरातील औद्योगिक परिसरात सातत्‍याने कचरा साचत आहे. हा कचरा वेळेवर उचलून घेऊन जाण्याबाबत पाठपुरावा करत आहे. साचलेल्‍या कचऱ्यामुळे आरोग्याच्‍या समस्‍या निर्माण होण्याची भीती आहे.
- संदीप बेलसरे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना.
फोटोः 52687

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com