‘मागासवर्गीयांचा निधी 
योग्य कामासाठी वापरावा’

‘मागासवर्गीयांचा निधी योग्य कामासाठी वापरावा’

Published on

पिंपरी, ता. ९ : महाराष्ट्र सरकारने १४ जुलै २०२४ अद्यादेश काढून अनुसुचित जातीसाठी राखीव निधी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ व इतर महामंडळाकडे वळविला आहे. अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी स्थापन करण्यात आलेला निधी हा त्‍यांच्‍यासाठीच वापरावा, अशी मागणी पुणे जिल्‍हा सर्व जाती जमाती कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रेय सोनवणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
सोनवणे यांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे की, अनुसूचित जातीचा निधी त्‍यांच्‍याच विद्यार्थ्यांवर खर्च होणे अपेक्षित आहे. सरकार काही आडमुठे धोरणे राबवत आहे. त्‍यामुळे विद्यार्थ्याच्या न्याय हक्कावर गदा आणली आहे. राज्यातील अनुसूचित जाती जमाती, मराठा, ओबीसी, भटके, विमुक्त आदी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी व उज्वल भविष्यासाठी बार्टी, सारथी, व महाज्योती या स्वायत्त संस्था स्थापन केलेल्या आहेत. याद्वारेच या संस्थांच्या वतीने विविध शैक्षणिक योजना व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेल्या मागासवर्गीयांच्या महामंडळावर अद्यापही अध्यक्ष नेमलेला नाही. तो नेमण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com