अभिजात भाषेचा दर्जा 
मिळाल्याबद्दल आनंदोत्सव

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आनंदोत्सव

Published on

पिंपरी, ता. ९ ः केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते फुगे आकाशात सोडून तसेच साखर व पेढे वाटण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, सुरेश साखवळकर, मसाप देहू शाखेचे अध्यक्ष दत्तात्रेय अत्रे, मावळ शाखेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पुरंदरे, संभाजी बारणे तसेच इतर मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.
यावेळी आयोजित केलेल्या मिरवणुकीत साहित्यिक, वाचक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सनई चौघडाच्या जल्लोषात, ‘मराठी भाषेचा विजय असो’ अशा घोषणा देत निगडीतील शांता शेळके सभागृहापासून ही मिरवणूक सुरू झाली. त्यानंतर शांता शेळके सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ या मराठी अभिमान गीतासोबतच मराठी मायबोलीच्या कविता व गाणी म्हणण्यात आली.
मराठी भाषा ही अभिजात होतीच, परंतु त्यास अभिजात भाषेचा दर्जा यासंबंधी राजमान्यता मिळाल्यानंतर मराठी माणसाची जबाबदारी वाढली असून मराठीचे जतन आणि संवर्धन करता असतानाच व्याकरणाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने शुद्ध मराठीत बोलण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. या प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रामुख्याने नमूद केले. सुरेश साखवळकर दत्तात्रेय अत्रे, श्रीकृष्ण पुरंदरे, बाळकृष्ण अमृतकर, कांचन नेवे, प्रतिमा काळे, प्राची देशपांडे, सुनीता बोडस तेजश्री पाटील यांनी मनोगतात मराठी भाषेला अभिजात भाषा अशी राजमान्यता मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. जन लाखे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा जाहीर होईपर्यंत २०१२ पासून त्यासाठी मसाप पिंपरी-चिंचवड शाखेने केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले. विनिता ऐनापुरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com