नाशिकच्या राज्यस्तरीय कुस्तीत सौरभला सुवर्ण; रणजितला रौप्य
पिंपरी, ता.१० ःआंबेगाव येथील राज्यस्तरीय फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेत दिघी गावच्या सौरभ जाधव याने ९७ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविले. तर नाशिक येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाच्या रणजित हिप्परकर याने रौप्य पदक आणि प्रणव लांडगे याने ब्राँझ पदकाची कमाई केली.
नाशिक येथील स्पर्धेच्या फ्रीस्टाईल प्रकारामध्ये आणि १५ वर्षांखालील ६२ किलो वजनगटात रहाटणीचा मल्ल रणजित हिप्परकर याने वरील पदक पटकावले. तर ग्रिकोरोमन प्रकारात १५ वर्षांखालील ५२ किलो वजन गटात भोसरीचा मल्ल प्रणव लांडगे याने ब्राँझ पदक मिळविले. याशिवाय, आंबेगाव येथे २० वर्षांखालील राज्यस्तरीय फ्रीस्टाईल अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत दिघी गावचा मल्ल सौरभ जाधव याने ९७ किलोगटात सुवर्णपदक पटकाविले. संघ व्यवस्थापक म्हणून राजू हिप्परकर, रूपेश जाधव यांनी काम पाहिले.
पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, कार्याध्यक्ष आमदार महेश लांडगे, सरचिटणीस संतोष माचुत्रे, ‘भारत केसरी’ पैलवान विजय गावडे, उपाध्यक्ष बाबासाहेब तांबे, दिलीप बालवडकर, विशाल कलाटे, काळुराम कवितके, बबन बोऱ्हाडे, आदी सर्व पदकविजेत्या मल्ल आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन केले आहे.
PNE24U53889, PNE24U53891
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

