आळंदीत स्पेस ॲप्स हॅकाथॉन स्पर्धा उत्साहात
पिंपरी, ता.९ ः आळंदी येथील माईर्स एमआयटी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक स्तरावरील ‘नासा इंटरनॅशनल स्पेस अॅप्स हॅकाथॉन २०२४’ स्पर्धा उत्साहात झाली. या स्पर्धेतील पन्नास विजेते नासा स्पेस अॅप्स चॅलेंजच्या ग्लोबल ग्रँड फिनालेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
या स्पर्धेत कोडर, शास्त्रज्ञ, डिझाइनर, तंत्रज्ञ आणि नवोदित व्यक्तींनी नासा आणि इतर अंतराळ संस्थांच्या खुल्या डेटाचा वापर करून पृथ्वी आणि अंतराळातील समस्यांवर उपाय शोधले. हॅकाथॉनमध्ये भारतासह आग्नेय आशियातील इंडोनेशिया, श्रीलंका आणि मलेशिया यांचा सहभाग राहिला. देशातील एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (छत्रपती संभाजीनगर), अजिंक्य डी.वाय.पाटील कॉलेज (विमाननगर), वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (कोथरूड) यासह इतर अनेक नामवंत संस्थांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत ७०० स्पर्धकांनी ऑनलाइन तर २०० स्पर्धकांनी ऑफलाईन सहभाग घेतला.
संचालक डॉ. बी.बी. वाफरे आणि उपप्राचार्या अक्षदा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन झाले. प्रा. अभिजित नेटके, अथर्व लेप्से, दुर्वेश वर्तक आणि मधुर घाटे यांनी या हॅकाथॉनसाठी समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. महाविद्यालयातील आयसीसी कौन्सिल सदस्य, विभाग प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी यांचे उत्तम सहकार्य लाभले.
ग्लोबल ग्रँड फिनालेत प्रतिनिधित्व
हॅकाथॉन हा महाविद्यालयांसाठी एक महत्त्वाचा आणि विविधतापूर्ण कार्यक्रम ठरला. या स्पर्धेतील पन्नास विजेते नासा स्पेस अॅप्स चॅलेंजच्या ग्लोबल ग्रँड फिनालेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. महाविद्यालयाचे संचालक डॉ. बाळासाहेब वाफरे यांनी या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्णतेचे कौतुक केले आणि या हॅकाथॉनमुळे तरुण मनांना तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जागतिक समस्यांवर उपाय शोधण्याची संधी मिळाल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

