‘संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मागणे म्हणजे खरी भक्ती ’
पिंपरी, ता. ८ ः ‘आपली दु:खे आणि संकटे स्वामींना कथन करण्यापेक्षा संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मागणे हीच खरी भक्ती होय’ असे प्रतिपादन श्रेयस बडवे यांनी व्यक्त केले. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवानिमित्ताने आयोजित कीर्तनात ते बोलत होते. चिंचवडगाव येथील बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण येथे पार पडलेल्या या कीर्तनात श्रेयस आणि मानसी बडवे या दांपत्याने कीर्तन जुगलबंदी सादर केली. मधू जोशी, दिनकर चिंचवडे, दीपक टाव्हरे, संजय आधावडे, मीनल देशपांडे, गणपती फुलारी, शंकर बुचडे, नितीन चिंचवडे, हेमा दिवाकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अभंग, भक्तिगीते, श्लोक, नाट्यगीते, पोवाडा, कविता, संतवचने म्हणत बडवे दांपत्याने नवरसांचा आनंद घेतला. ‘आपल्या वैयक्तिक दु : खांपेक्षाही स्वामी मोठे आहेत. देश महान व्हावा असे वाटत असेल तर सज्जनशक्ती एकत्रित झाली पाहिजे.’ असे मार्गदर्शन केले. धनवर्षा प्रभुणे यांनी संवादिनीवर तर मिलिंद तायवाडे यांनी तबल्यावर साथसंगत केली.
या उत्सवात पहाटे धन्वंतरी अभिषेक, पूजा, श्रींची आरती, स्वामी स्वाहाकार हे धार्मिक विधी झाले. दुपारी महानैवेद्य व आरती घेण्यात आली. दरम्यान, सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत झालेल्या रक्तदान शिबिरात तीस बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.