
पालकांनी एकत्र यावे
आजच ‘सकाळ’ मध्ये नर्सरी प्रवेशाबद्दल बातमी वाचली. नर्सरी चालकाच्या आहारी जाण्यापेक्षा सर्व पालकांनीच भरमसाठ शुल्क देऊ नये. अन्यथा गणवेश, बुट, पुस्तके यांचे पैसे वेगळेच. त्या करिता सर्व पालकांनीच एकत्र विचार करून निर्णय घ्यावा, तरच हे कुठेतरी थांबेल.
- कमलाकर कुलकर्णी, चिंचवड
ईडी अथवा प्राप्तिकर कारवाई हवी
‘नर्सरी प्रवेशातून लाखो रूपयांची लूट’ शैक्षणिक क्षेत्रात पालकांची होणारी लूट या महत्त्वाच्या विषयावर ‘सकाळ’ने आज प्रकाशझोत टाकला. खरे तर राजकीय नेत्यांबरोबर शिक्षण संस्थांवर देखील ईडीची कारवाई किंवा प्राप्तिकर विभागाची धाड पडली पाहिजे. त्याशिवाय या संस्था जागेवर येणार नाही. शिक्षण मंत्रालयाने धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे. चांगले शिक्षण म्हणजे काय ? हाय-फाय राहणीमान होऊ शकते काय ? एखाद्या ढ विद्यार्थ्याला ते मेरीटमध्ये आणू शकतात काय? शेवटी बुद्धी हेच प्रमाण ठरू शकते. मग, एवढी शुल्क कशासाठी ? आज ‘सकाळ’ने एक महत्त्वाच्या विषयला वाचा फोडली.
- प्रकाश परदेशी, आकुर्डी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.