अमली पदार्थाची भीती घालून फसवणूक

अमली पदार्थाची भीती घालून फसवणूक
Published on

पिंपरी, ता.२२ : अमली पदार्थ विरोधी विभागाचे पोलिस अधिकारी असल्याचे व कुरियरमध्ये ड्रग्ज मिळाल्याचे खोटे सांगून अटकेची भीती घालत फसवणूक करणाऱ्या राजस्थानच्या चौघा जणांच्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मोहम्मद इलियास मोहम्मद सदिक कलाल (वय ३६ वर्षे, रा. लोसल, जि. सिकर, जयपूर, राजस्थान), मोहम्मद शाहीद अहमद अली (वय २५), पुरणसिंग रतन सिंग (वय २४), नाजील खत्री मन्वरअली खत्री (वय २९, तिघेही रा.जोधपूर, राजस्थान) अशी आरोपींची नावे आहेत.
वाकड येथील एका व्यक्तीला आरोपींनी कॉल करुन अमली पदार्थ विरोधी विभागाचे पोलिस अधिकारी असल्याचे व कुरियरमध्ये ड्रग्ज मिळाल्याचे खोटे सांगून त्यामध्ये अटकेची भीती घालत १२ लाख २२ हजारांची फसवणूक केली. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सायबर पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या बँक खात्यांपैकी एक खाते हे नाशिक येथील रिक्षा चालविणाऱ्या गरीब व्यक्तीचे आहे. त्यानुसार, नाशिक येथे पोलिसांचे पथक पाठवून तपास केला असता एक व्यक्ती बँक पासबुक, चेक बुक घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. तसेच त्याचे जोधपूर, राजस्थान येथील काही साथीदार पिसोळी, उंड्री भागात काही दिवसांपासून राहत असल्याचीही माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने पिसोळी येथे छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी १८ मोबाईल, ९० मोबाईल सिमकार्ड, १ लॅपटॉप, ६० बँक पासबुक किट, ६० एटीएम/डेबिट कार्ड, २ पासपोर्ट, १५ आधार कार्ड, ३ पॅन कार्ड, ३ वाहन परवाना, सतराशे रुपयांची रोकड व दोन मोटारी अशा एकूण ७२ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com