Pune Kidnapping News
Pune Kidnapping Newssakal

Pune Kidnapping News : चिखलीतील अल्पवयीन अपहृत मुलीची सुटका ; हिमाचल प्रदेशातून स्वगृही

चिखलीमधून अपहरण केलेल्या तेरा वर्षीय मुलीची हिमाचल प्रदेश येथील डोंगराळ भागातून चिखली पोलिसांनी सुखरूप सुटका केली. या आरोपीला अटक झाली आहे.

पिंपरी : चिखलीमधून अपहरण केलेल्या तेरा वर्षीय मुलीची हिमाचल प्रदेश येथील डोंगराळ भागातून चिखली पोलिसांनी सुखरूप सुटका केली. या आरोपीला अटक झाली आहे.
सुरोज रेजाउल शेख (वय २१, रा. कुदळवाडी, मूळ रा. मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

चिखलीतील जाधववाडी परिसरात राहणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे २६ जानेवारी २०२४ रोजी अपहरण झाले. पोलिसांनी चिखली परिसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता ही मुलगी एका अज्ञात तरुणासोबत जात असल्याचे आढळले. त्यानुसार, पोलिसांनी तपास केला असता आरोपी कुदळवाडी परिसरात चिकन सेंटरवर काम करणारा सुरोज शेख असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, त्याच्या संपर्कातील व्यक्तीबाबत माहिती काढली असता तो नियमितपणे रुपसिंग ठाकूर या नेपाळी तरुणाच्या संपर्कात असल्याचे समजले. रुपसिंगच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले असता तो चंडीगड ते सिमला, हिमाचल दरम्यानच्या पूर्व बाजूकडील गावात वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर, चिखली पोलिसांचे एक पथक तत्काळ त्याठिकाणी रवाना झाले.

दोन दिवस चंडीगड ते सिमला, हिमाचल प्रदेश दरम्यानच्या पूर्व बाजूस असणाऱ्या डोंगराळ भागातील खेडेगावांमध्ये शोध घेतला असता आरोपी सुरोज हा हिमाचल प्रदेशमधील भोजनगर, ता.परवानु, जिल्हा सोलन येथे एका ठेकेदाराकडे मजुरीचे काम करत असल्याची माहिती मिळाली. तेथे

पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याने, मुलीला फूस लावून पळवून आणल्याची पोलिसांना कबुली दिली. चिखलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहायक निरीक्षक उद्धव खाडे, अंमलदार अमर कांबळे, सूरज सुतार, कबीर पिंजारी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com