

सोमाटणे,ता.३ ः अधिक उत्पादनासाठी परदेशी रेडनेपीअर गवत व मका हे एकत्र पीक घेण्याचा यशस्वी प्रयोग साळुंब्रे येथील शेतकऱ्यांनी केला आहे. दुभत्या जनावरांना खाद्य म्हणून ही पिके घेण्यात आली आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून पवन मावळात दुभत्या जनावरांना सकस आहार म्हणून रेडनेपीअर गवत लावण्यास काही शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती. या गवताची महत्त्वाची वैशिष्टे म्हणजे त्यांची उंची व उत्पादन अधिक निघत असून यात घटकद्रव्याचे प्रमाण अधिक असल्याने दुध देणाऱ्या जनावरांसाठी हा चांगला चारा आहे. या गवताची लावणी केल्यानंतर पूर्ण वाढ होण्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो. तोपर्यंत या पीकास आवश्यकते प्रमाणे खत व पाणी द्यावे लागते. या काळात या परदेशी रेडनेपीअरमध्ये कोणतेही आंतर पीक घेतले जात नव्हते. परंतु, साळुंब्रे येथील शेतकरी दिलीप राक्षे
यांनी प्रायोगिक तत्वावर रेडनेपीअर पिकात आंतरपीक म्हणून मक्याची लावणी केली होती. सध्या त्यांचे मक्याचे पीक कापणीला आले असून मिश्र पीक लावल्याने नेहमीपेक्षाची पिकाची वाढ जलद व चांगली झाली आहे. त्याद्वारे, उत्पादनही अधिक निघण्याची राक्षे यांना अपेक्षा आहे.
परदेशी रेडनेपीअर गवत व मका ही दोन्ही पिके एकत्र घेतल्यास त्यांचे उत्पादन नेहमीपेक्षा अधिक निघत असल्याने शेतकऱ्यांनी असा प्रयोग करावा.
- दिलीप राक्षे, प्रयोगशील शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.