नियोजनाचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवरायांचे स्वराज्य प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे प्रतिपादन

नियोजनाचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवरायांचे स्वराज्य 
प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे प्रतिपादन
Published on

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. ३ : ‘‘छत्रपतींनी अठरा पगड जातींच्या लोकांना बरोबर घेऊन संघर्षातून सुराज्य स्थापन केले. शिवरायांनी पन्नास वर्षांत एवढे किल्ले बांधले. मात्र, कोणत्याही किल्ल्याला स्वतःचे नाव दिले नाही. नियोजन काय असते, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते,’’ असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केले. तळेगाव दाभाडे येथील सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालय यांच्या वतीने कै. कल्याणराव ऊर्फ रामचंद्र जाधव यांच्या स्मरणार्थ जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लोकसंवाद व्याख्यानमाले अंतर्गत प्रा. बानगुडे पाटील यांच्या ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक एक राष्ट्रोत्सव’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. या वेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, उमाकांत कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, पं. सुरेश साखवळकर, गणेश काकडे, निखिल भगत, ज्येष्ठ कवी प्रभाकर ओव्हाळ, संग्राम जगताप, सुदर्शन खांडगे, प्रा. प्रमोद बोऱ्हाडे आदी उपस्थित होते. प्रा. बानगुडे पाटील म्हणाले की, ‘‘स्वराज्य उभारताना महाराजांनी राष्ट्र ही संकल्पना प्रथम मानली. महाराजांनी तयार केलेले मंत्रिमंडळ, न्यायव्यवस्था, गुप्तहेर यंत्रणा, व्यवस्थापन हे आजही मार्गदर्शक आहेत. आज जो महाराष्ट्र कृषिप्रधान दिसत आहे, त्याचे सर्व श्रेय शिवरायांना जाते. आज जगातल्या अनेक देशांनी शिवरायांची रणनीती स्वीकारल्याचे दिसते.’’ संस्थेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद निकम यांनी सूत्रसंचालन, तर राजेश बारणे यांनी आभार मानले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मोठी ग्रंथनिर्मिती झाली. लेखक, कवींना मान, प्रतिष्ठा मिळवून दिली. नंतरच्या काळात मात्र ही ग्रंथनिर्मिती मंदावल्याचे दिसते. एकंदरीत साहित्यमन घडविण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी केले. ग्रंथामुळेच माणसे घडायला सुरुवात झाली.
प्रा. नितीन बानगुडे पाटील, शिवव्याख्याते

यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव...
सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या अभ्यासिकेत अभ्यास करून स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या पीडब्लुडीचे कनिष्ठ अभियंता ओंकार विजय डोके, वरिष्ठ सहायक लेखापाल सचिन लोखंडे, सीडीएस प्रणव भेगडे यांचा प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com