हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनची मिनी मॅरेथॉन उत्साहात

हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनची मिनी मॅरेथॉन उत्साहात
Published on

पिंपरी, ता.३ ः हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशन (एचआयए)मार्फत, सदस्य कंपन्यांतील कर्मचाऱ्यांसाठी ५ किमी आणि १० किमी अंतराची मिनी मॅरेथॉन आणि वॉकेथॉन आयोजित करण्यात आली. या उपक्रमात सुमारे २ हजार धावपटूंनी सहभाग घेतला.
कर्नल चरणजीत सिंग भोगल यांनी टाटा टेक्नॉलॉजीज (टीटीएल) चे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वॉरन केविन हॅरिस यावेळी उपस्थित होते. मिनी मॅरेथॉनचे उद्‍घाटन करताना ‘एचआयए’चे अध्यक्ष कृष्णन सुब्रमण्यम यांनी उत्तम आरोग्यासाठी धावणे आणि चालणे आवश्यक असून प्रत्येकाने धावण्याची सवय लावणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच ही शर्यत स्पर्धा नाही. प्रत्येकाने सौहार्द आणि सहकार्याच्या भावनेने सहभागी व्हावे.’’
कार्यक्रमाची सकाळी सव्वा सहा वाजता झुम्बा नृत्याने सुरुवात झाली. सकाळी ६.४५ वाजता १० किमी धावण्याच्या या स्पर्धेला वॉरेन हॅरिस, सीईओ आणि एमडी टीटीएल यांनी हिरवा झेंडा दाखवला.
त्याच्या १५ मिनिटांनंतर ५ किमीच्या धावपटूंच्या शर्यतीला सुरुवात झाली. वॉरेन हॅरिस यांनी स्वतः त्यात सहभागी होत सर्वांना प्रोत्साहित केले. सर्व सहभागी धावपटूंना पदके प्रदान करण्यात आली. नोव्हेंबर २०२३ मध्ये सायक्लॉथॉन आयोजित केल्यानंतर ‘एचआयए’ने आता मार्च २००४ मध्ये मॅरेथॉनचे आयोजन केले. इंडो ॲथलेटिक सोसायटी (आयएएस) चे सहकार्य लाभले.
PNE24U05854

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com