मेफेड्रॉन टाकलेल्या वाहनाच्या शोधासाठी पोलिसांची धावाधाव

मेफेड्रॉन टाकलेल्या वाहनाच्या शोधासाठी पोलिसांची धावाधाव
Published on

पिंपरी, ता. ३ : ४५ कोटींच्या मेफेड्रॉन या अमली पदार्थाच्या गुन्ह्यात पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील फौजदार विकास शेळके याला अटक केल्याने खळबळ उडाली. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन कुठून आले ? याचा शोध सुरु असून ज्या वाहनातून मेफेड्रॉनचे पोते रस्त्यावर पडले, त्या वाहनाच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची धावाधाव सुरु आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह इतरही माहिती घेतली जात आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या फौजदार शेळके याच्यावर निलंबन कारवाई करण्यासाठी अहवाल पाठविण्यात आल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पिंपळे निलख येथे शुक्रवारी (ता.१) पहाटे सांगवी पोलिसांनी आरोपी नमामी शंकर झा (वय ३२, रा. निगडी) याला ताब्यात घेत त्याच्याकडून दोन कोटी रुपये किमतीचे मेफेड्रॉन जप्त केले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत निगडी पोलिस ठाण्यातील फौजदार विकास शेळके याचे नाव समोर आल्याने त्यालाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एकूण ४४ कोटी ७९ लाख ८० हजार रूपये किमतीचे मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केले आहे.
२६ फेब्रुवारीला एका मोटारचालकाला निगडी परिसरातील रस्त्यावर एका वाहनातून पोते पडल्याचे दिसले. त्याने ते पोते निगडी भक्ती-शक्ती चौकात नाकाबंदीवरील पोलिस अंमलदार सुधीर ढवळे व अनिल चव्हाण यांच्याकडे दिले. याबाबत त्यांनी शेळके याला माहिती दिली. त्यानंतर, शेळके याने झा याला बोलावून घेत मेफेड्रॉन विक्रीसाठी ग्राहक पाहण्यास सांगितले. त्यानंतर, हा सर्व प्रकार समोर आला. दरम्यान, ज्या ट्रकमधून मेफेड्रॉनचे पोते पडल्याचे दिसत आहे. त्या ट्रकचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरु असून तो ट्रक शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com