नदीपात्रात राडारोडा;
पाच जणांवर गुन्हा

नदीपात्रात राडारोडा; पाच जणांवर गुन्हा

पिंपरी, ता. २५ : नदीपात्रात राडारोडा टाकल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपळे निलख येथील सीएनजी पेट्रोल पंपामागील नदी पात्रात घडला. याप्रकरणी स्वप्नील मनोहर पाटील (रा. यशवंतनगर, अजमेरा, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हरिभाऊ काळुराम साठे (वय ६२), ज्ञानोबा काळुराम साठे (वय ६५), अमोल बबन साठे (वय ५५), लक्ष्मण कोंडिबा कामठे (वय ६०), सुभाष कोंडिबा कामठे (वय ५८, सर्व रा. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराशेजारी, पिंपळे निलख) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या व्यक्तींनी प्रवाहित मुळा नदीत बांधकाम राडारोडा, दगड, कचरा टाकून नदीप्रदूषण केले. पर्यावरण विभागाच्या आदेशाचे उल्लंघन केले. या बांधकाम राडारोड्यामुळे भविष्यात संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता अनेकपटींनी वाढलेली आहे. यामुळे शहराला पूरस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या व्यक्तींवर पर्यावरण (संरक्षण) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
--------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com