गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू
चिखली : भरधाव ट्रकच्या धडकेत जयश्री पंकज खोपे (वय ३०) या दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा आरुष हा गंभीर जखमी झाल्याची घटना चिखली येथे घडली.
या प्रकरणी वैभव भानुदास आगरकर (रा. वारजे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रक चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांची मामे बहीण जयश्री खोपे या दुचाकीवरून मुलगा आरुष याला शाळेत सोडण्यासाठी जात होत्या. त्यावेळी चिखलीतील देहू-आळंदी रस्त्यावरील रामकृष्ण हरी चौकात भरधाव ट्रकने जयश्री यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये जयश्री यांचा मृत्यू झाला. तर आरुष गंभीर जखमी आहे. अपघातानंतर आरोपी ट्रक तेथेच सोडून पसार झाला.

कामाचे पैसे मागितल्यामुळे तरुणाला बेदम मारहाण
पिंपरी : कामाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून तरुणाला बांबूने बेदम मारहाण केल्याप्रकरणी विक्रम परमार (वय २८, रा. लक्ष्मी चौक, मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी भरत पन्ना सिंग (वय २८) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या दोन्ही हातांवर मारून किरकोळ जखमी केले. यानंतर मला पैसे मागितले तर याद राख, अशी धमकी दिली.

तडीपार आरोपीला कोयत्यासह अटक
पिंपरी : पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले असतानाही हद्दीत आलेल्या दीपक शशिकांत पवार (वय २५, रा. श्रीराम हौसिंग सोसायटी, ओटा स्कीम, निगडी) या आरोपीला पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. ही कारवाई भोसरीत पुणे-नाशिक महामार्गालगतच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्टच्या गेटसमोर करण्यात आली.

भोसरीत सव्वा लाखांचा अपहार
पिंपरी : महिलेचे सोन्याचे दागिने काढून घेत सव्वा लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार भोसरीतील गवळीनगर येथे घडला.
या प्रकरणी पुष्पा अंबादास उकीर्डी (रा. दिघी रोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या त्यांच्या कॅंटीनचे काम संपवून घरी जात असताना छावा चौक येथे दोन अज्ञात व्यक्ती त्यांना भेटल्या. त्यांनी फिर्यादीचे सोन्याचे कानातले व सोनसाखळी काढून घेतली.

प्रवासी महिलेचा पावणे दोन लाखांचा ऐवज लंपास
पिंपरी : अहमदनगर ते मोहननगर असा मोटारीने प्रवास करताना प्रवासी महिलेचा एक लाख ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
या प्रकरणी कुंदा उदय नामदे (रा. मोहननगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांनी अहमदनगर ते मोहननगरपर्यंत मोटारीने व बसने प्रवास केला. यामध्ये आरोपीने फिर्यादीची नजर चुकवून त्यांच्या पर्समधील एक लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व साडे पाच हजारांची रोकड असा एकूण एक लाख ७० हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरला.

फेसबुकचे बनावट खाते तयार करून फसवणूक
पिंपरी : फेसबुकचे बनावट खाते उघडून एकाची फसवणूक केल्याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणी ५३ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीचे फेसबुक खाते हॅक करून त्याचा परवानगी ऍक्सेस घेऊन त्या खात्यावरून फिर्यादीच्या परवानगीशिवाय फिर्यादी यांचे फोटो व इतर माहिती घेतली. त्याद्वारे फिर्यादी यांचे बनावट फेसबुक खाते तयार करून फिर्यादीच्या फेसबुक खात्यातील फ्रेंडचे संपर्क क्रमांक मिळविले. त्याचा वापर फसवणुकीसाठी करीत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com