‘श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव २०२४’ चे 
चिंचवडमध्ये आयोजन

‘श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव २०२४’ चे चिंचवडमध्ये आयोजन

पिंपरी, ता. ४ ः श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाने ६ एप्रिल ते १० एप्रिल या दरम्यान पाच दिवसीय ‘श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सव २०२४’ चे आयोजन केले आहे. बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी-चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी (ता. ६) डॉ. संजय उपाध्ये ‘मन करा रे प्रसन्न’ या विषयावर निरूपण करतील. रविवारी (ता.७) श्रेयस बडवे आणि मानसी बडवे या दांपत्याची कीर्तन जुगलबंदी होईल. तसेच सकाळी ९ ते दुपारी २ या काळात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सोमवारी (ता. ८) ज्योती गोराणे आणि सहकारी यांचा ‘स्वर जोर्तिमय शाम’ हा बहारदार गीतांचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी (ता. ९) भक्तिगंधर्व मुकुंद बादरायणी आणि सहकारी ‘स्वरसमर्थ अभंगवाणी’ सादर करतील. हे सर्व कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता होणार आहेत. गुढीपाडव्यानिमित्त (ता.९) सायंकाळी ५:३० वाजता ज्येष्ठ स्वामीभक्त मधू जोशी यांच्या व्याख्यानाचा लाभ घेता येईल. बुधवारी (ता.१०) सकाळी १० वाजता श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त कबीरमहाराज अत्तार कीर्तनसेवा रुजू करणार आहेत. सुखदेवमहाराज बुचडे आणि सहकारी साथसंगत करतील. दुपारी १२:३० ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच नियमित पहाटे ४ ः ३० वाजता श्रींचा अभिषेक , पूजा, आरती, स्वामी स्वाहाकार, श्री गुरुलीलामृत ग्रंथ पारायण, दुपारी १२ वाजता महानैवेद्य आणि आरती, सायंकाळी श्रींची आरती हे धार्मिक विधी होतील. या उत्सवाचा लाभ सर्व भाविकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे (पाटील) यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com