सकाळ विद्या प्रतिक्रिया 
सकाळ विद्या प्रतिक्रिया

सकाळ विद्या प्रतिक्रिया सकाळ विद्या प्रतिक्रिया

शिक्षण संस्थाचालक म्हणतात...
महाराष्ट्राच्या अग्रणी दैनिक सकाळ माध्यम समूहाने गेल्या अनेक वर्षांपासून सकाळ विद्या एक्स्पो माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवून त्यांचे उत्तम करिअर घडविले आहे. विद्यार्थ्यांचा योग्य मार्गदर्शक, पाठीराखा म्हणून ‘सकाळ’चा नावलौकिक आहे. सकाळ विद्या एक्स्पोद्वारे एकाच छताखाली सर्व शैक्षणिक पर्याय आणि संधी उपलब्ध झाल्या असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा.
- ज्ञानेश्वर दळवी, अध्यक्ष, साई सकल शिक्षण प्रसारक मंडळ


सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कुंभमेळाच आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून विविध क्षेत्रांतील शैक्षणिक अभ्यासक्रमांची माहिती तर मिळणार आहेच. तसेच शैक्षणिक संस्थांच्या समुपदेशकांशी प्रत्यक्षपणे संवाद साधण्याची संधी मिळेल.
- डॉ. आर. एस. यादव, सचिव, अलार्ड चॅरिटेबल ट्रस्ट

पालक म्हणतात...
सकाळ विद्या एक्स्पो हे अतिशय माहितीपूर्ण आहे. प्रत्येक स्टॉलवर माहिती सविस्तर आणि व्‍यवस्थित देण्यात आली. अशा ‘इव्हेंट’मुळे मुलांसाठी योग्य दिशा मिळते. करियरचे पर्याय उपलब्ध होतात. सध्या कोणत्या क्षेत्रात संधी आहे. चांगले भविष्य घडविण्यासाठी कोणते अभ्यासक्रम निवडले पाहिजे, हे ‘सकाळ’च्या प्रदर्शनातून समजले. याबद्दल सकाळ माध्यम समूहाचे धन्यवाद.
- ऋषिकेश बर्दापूरकर, हिंजवडी

बऱ्याचदा महाविद्यालयांमध्ये कोणते अभ्यासक्रम हे कोणत्या शाखांमध्ये उपलब्ध आहेत? याची माहिती नसते. आम्हाला मोजक्याच अभ्यासक्रमाची माहिती होती. पण, या विद्या एज्युकेशन एक्स्पोतून अभ्यासक्रमांबरोबरच कॅम्पसचीही माहिती एकाच ठिकाणी मिळाली. मला दोन महाविद्यालये आवडली आहेत.
- पूनम रानवडे, निगडी प्राधिकरण


विद्यार्थी म्हणतात...
माझ्यासारख्या नुकतीच दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सकाळ विद्या एक्स्पोद्वारे चांगली संधी मिळाली. दहावी- बारावीनंतर काय करायचं? कोणते अभ्यासक्रम आहेत? त्यांची प्रवेश प्रक्रिया काय आहे? प्रवेश शुल्क किती? याविषयीही माहिती मिळाली.
- सेजल सावंत, काळेवाडी

मी यावर्षी नववी पास झाले आहे. दहावी नंतर काय? व कोणकोणत्या क्षेत्रातील करियरचे पर्याय उपलब्ध आहेत, याची सखोल माहिती प्रदर्शनातून मिळाली. तज्ज्ञ प्राध्यापकांनी चर्चासत्रातून केलेले मार्गदर्शन खूप उपयुक्त ठरले आहे. त्यांचा फायदाही निश्चित झाला आहे.
- अनुष्का चव्हाण, रहाटणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com