सातव्या वेतन आयोग निश्‍चितीमध्ये त्रुटी पदवीधर शिक्षकांवर अन्याय होत असल्याची भावना, दुरुस्तीची मागणी

सातव्या वेतन आयोग निश्‍चितीमध्ये त्रुटी
पदवीधर शिक्षकांवर अन्याय होत असल्याची भावना, दुरुस्तीची मागणी
Published on

पिंपरी, ता. २३ ः राज्यभर सातव्या वेतन आयोगानुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास सुरवात झाली आहे. मात्र, जानेवारी २०१६ नंतर वरिष्ठ वेतनश्रेणी मिळालेले शिक्षक व पदवीधर शिक्षक यांना कमी वेतनवाढ होत असल्याने सुधारित वेतन निश्चितीमधील दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. परिणामी, पदवीधर शिक्षकांवर सातव्या वेतन आयोगात वेतन निश्चितीमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
१ जानेवारी २००६ नंतर सहाव्या वेतन आयोगात ४२०० ग्रेड वेतन असणाऱ्या शिक्षकाने पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती स्वीकारल्यास त्याचे ग्रेड वेतन ४३०० रुपये करण्यात येत होते. एकूण वेतनात फक्त २०० -२५० रुपयाची वाढ होत असे. सहायक शिक्षकांना १ जानेवारी २०१६ नंतर पदवीधर शिक्षकाला विषय शिक्षक या पदावर नियुक्ती दिली आहे. अशा पात्र ३३ टक्के शिक्षकांना शासन निर्णय १३ ऑक्टोबर २०१६ नुसार पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी देण्यात येते. सातव्या वेतन आयोगानुसार, २०१६ नंतर सहायक शिक्षकाला पे मॅट्रीस एस-१३ मधून पदवीधर शिक्षक वेतनश्रेणी पे मॅट्रीस एस-१४ मध्ये पुढील मूळ वेतन देण्यात येते. अशा प्रकारे वेतन निश्चिती देण्यात आल्यानंतर वेतनात सुमारे २५०० ते ३००० रुपये फरक होत आहे. परंतु २०१६ पूर्वी पदवीधर शिक्षक पदावर नियुक्त केलेल्या त्याच्याबरोबर सेवेत रुजू झालेल्या व २०१६ नंतर पदवीधर शिक्षक वेतनश्रेणी घेणाऱ्या शिक्षकांपेक्षा सुमारे २५०० ते ३००० रुपये कमी वेतन मिळत आहे.

सहायक शिक्षकांपेक्षा कमी वेतन
सुधारित वेतन निश्चितीमध्ये ४३०० ग्रेड पे असणारे पदवीधर व मुख्याध्यापक यांना उपशिक्षकांपेक्षा मूळ वेतनात १०० रुपये कमी मिळत आहेत. वेतननिश्चिती करत असताना १ जानेवारी २००६ ते १ जानेवारी २०१६ या कालावधीत पदवीधर वेतनश्रेणी (९३०० -३४५०० ) लागू केलेल्या ४३०० ग्रेडवेतन मिळत असलेल्या पदवीधर शिक्षकांना त्याच्यासोबत सारखीच नियुक्त दिनांक असलेल्या व कनिष्ठ असलेल्या (९३००-३४५०० ) ४२०० ग्रेड वेतन मिळत असलेल्या सहाय्यक शिक्षकांपेक्षा कमी वेतनावर निश्चिती होऊन कमी वेतन मिळत आहे. महाराष्ट्र राज्य पदवीधर, प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्यावतीने दिली आहे. के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समितीसमोर प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने वेतनत्रुटीबाबत लेखी प्रस्ताव सादर करण्यात आला.



विद्यमान वेतन संरचना सुधारित वेतन मॅट्रीक्समधील वेतन स्तर
वेतन श्रेणी ग्रेड वेतन
९३००-३४८०० ४३०० S-१५ : ४१८००-१३२३००

९३००-३४८०० ४४०० S-१६ : ४४९०० -१४२४०० (वरिष्ठ श्रेणी)

९३००-३४८०० ४८०० S-१७ : ४७६००-१५११०० वरिष्ठ श्रेणी २० टक्के पोस्ट


‘‘राज्यातील कार्यरत हजारो पदवीधर शिक्षकांवरील वेतनश्रेणीबाबत असलेल्या त्रुटी दूर करून पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणीबाबत सातव्या वेतन आयोगाच्या त्रुटीचा प्रस्ताव दिलेला आहे. वेतननिश्चिती करून वेतन अदा करण्याचे आदेश देण्यात यावेत.
-मनोज मराठे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com