औषधनिर्माण महाविद्यालयामध्ये निरोप समारंभ

औषधनिर्माण महाविद्यालयामध्ये निरोप समारंभ

- डॉ. नीरज व्यवहारे
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माण महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षातील पदविका, पदवी व पदव्युत्तर या तिन्ही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे, उपप्राचार्य डॉ. शिल्पा चौधरी, डॉ. रमेश काटेदेशमुख आणि समन्वयक डॉ. शुभांगी दसवडकर, डॉ. सारिका निकम व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी तांत्रिक नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले. उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार तसेच विविध स्पर्धांमधील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या ‌विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करीत आठवणींना उजाळा दिला. यावेळी डी. फार्मसीमधून प्राची धोंडे, बी. फार्मसीमधून डोलिसा जैन तर एम. फार्मसीमधून स्नेहल गायकवाड यांना ‘सर्वोत्कृष्ट विद्यार्थी’ पुरस्कार देण्यात आला. यावेळी डॉ. नीरज व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांना पुढील जीवनात यशस्वी होण्यासाठी जबाबदारी घेणे आणि नैतिक तत्त्वे जपणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही ठिकाणी काम करण्याची तयारी ठेवावी. असा सल्ला देत, बदलत्या औद्योगिक विश्वात वावरताना फार्मासिस्ट यांच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन श्रुतिका धुमाळे आणि सानिका पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी तसेच डॉ. शुभांगी दसवडकर, प्रा. सारिका निकम आणि प्रा. मुकेश मोहिते यांनी परिश्रम घेतले.
24U18216

महात्मा फुले महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा
- विद्यासागर वाघेरे
पिंपरी ः रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात नुकतेच माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. (डॉ.) माधव सरोदे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव अॅड. सतीश गोरडे हे उपस्थित होते. याप्रसंगी माजी विद्यार्थी संघटनेचे खजिनदार बाळासाहेब वाघेरे यांनी आपले वडील यशवंत वाघेरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक लाखाचा धनादेश प्राचार्यांकडे सुपूर्द केला. या मेळाव्यासाठी विजय चौधरी (उद्योजक), संजय गायके (सामाजिक कार्यकर्ते), जगदीश चासकर (अण्णासाहेब मगर सह. बँक) माजी विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी विविध माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. गुणवंत प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे प्रमुख प्रा. विद्यासागर वाघेरे यांनी केले. तर नॅक मानांकनाचा आढावा डॉ. नीलकंठ डहाळे यांनी घेतला. आभार प्रा. शहाजी मोरे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रो. डॉ. कामायनी सुर्वे आणि डॉ. प्रतिमा कदम यांनी केले.

सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभ उत्साहात
ः- प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे
अध्यापन ही अध्यापकाच्या जीवनातील तरुण पिढीला घडविण्याची महत्त्वपूर्ण आणि आनंददायी प्रक्रिया आहे. मात्र, नियत वयोमानानुसार निवृत्ती अटळ आहे. निवृत्ती म्हणजे सर्व कामकाजातून मुक्तता नसते. काही ना काही कार्य जीवनभर करावेच लागते, त्यामुळे निवृत्ती म्हणजे कामातील बदल असतो, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे यांनी केले. प्रा. शहाजी मोरे व ग्रंथालय परिचर दत्तात्रेय गणगे यांच्या सेवापूर्ती शुभेच्छा समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावि‌द्यालयाच्या माजी वि‌द्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विशाल मासुळकर होते. महावि‌द्यालयाच्या संख्यात्मक आणि गुणात्मक वाढीसाठी प्रा. शहाजी मोरे यांनी केलेल्या कार्याचा लेखाजोखा प्राचार्य प्रा. डॉ. माधव सरोदे यांनी मांडला. प्राध्यापक मोरे यांनी विज्ञान क्षेत्रात सातत्याने लेखन केलेले आहे, मात्र यापुढील काळात समाज जीवनातील विविध प्रश्नांवर त्यांनी मांडणी करावी, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. वैशाली मोरे, दत्तात्रेय गणगे, डॉ. दत्तात्रेय हिंगणे, डॉ. नीलकंठ डहाळे, उपप्राचार्य डॉ. मृणालिनी शेखर, उपप्राचार्य प्रा. अनिकेत खत्री, तृप्ती आंबरे, लक्ष्मण जगदाळे, अनिता तारळेकर, डॉ. कौस्तुभ मोरे, डॉ. पल्लवी मोरे, कौशल मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. शुभदा लोंढे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संग्राम गोसावी यांनी आभार मानले.

सिद्धी कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांना संधी
- प्रा. सारंग कुलकर्णी
नॅशनल वेल्फेअर असोसिएशन, केमिस्ट ॲण्ड एमएसबीटीई आणि डी. फार्मसी कॉलेज पुणे यांच्या वतीने ‘मेगा फेअर २०२४’चे आयोजन करण्यात आले होते. या नोकरी मेळाव्यात ४५ महाविद्यालय आणि २६ फार्मा कंपनीच्या प्रतिनिधींनी उपस्थिती लावली. डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी मिळाली आहे. प्रताप यादव आणि ऋतुजा यादव (मेडप्लस), योगेश कोळी, आशिष त्रिपाठी (श्लोका मेडिको), बसवराज जिरोली (मेडप्लस) या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. संस्थेचे अध्य‌क्ष एस. बी. पाटील, खजिनदार गणेश पाटील, प्राचार्य डॉ. प्रवीण साबळे यांनी त्यांचा सत्कार केला. प्रा. सारंग कुलकर्णी, प्रज्ञा ठाकर, रूपाली चौधरी, धनश्री मोहिते, शिल्पा गावडे यांनी परिश्रम घेतले.
NE24U18217

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com