वादळी वाऱ्यासह वळीव बरसला 
पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांची तारांबळ, अनेक ठिकाणी झाडे कोसळली

वादळी वाऱ्यासह वळीव बरसला पिंपरी चिंचवडमध्ये नागरिकांची तारांबळ, अनेक ठिकाणी झाडे कोसळली

पिंपरी, ता. १० ः ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट सोबतच सोसाट्याच्या वाऱ्यासह पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागांत आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास मुसळधार वळीव बरसला. अचानक पाऊस आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक टपऱ्या उडाल्या. दुकाने, मोठमोठे फलक कोसळले. काही ठिकाणी विजेचे खांब आडवे झाले. रहाटणी, वाल्हेकरवाडी, वाकड, मुकाई चौक- किवळे या परिसरात झाडे उन्मळून पडल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले. शहराच्या बहुतांश भागातील वीजही गायब झाली होती. जुनी सांगवी परिसरात रस्त्यांवरून पाणी वाहत होते. अनेक ठिकाणी सखल रस्त्यांवर पाणी तुंबल्याने नागरिकांना पाण्यातून वाट काढत घर गाठावे लागले.
गेल्या आठवड्यापासून दररोज वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

पावसाचा प्रचारावर परिणाम
लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांच्या हातात प्रचारासाठी अवघे दोन दिवस राहिल्याने कॉर्नर सभा, रॅली, मोठ्या सभा आणि भेटीगाठी असा जोरदार कार्यक्रम सुरू आहे. त्यातच आज पावसाने हजेरी लावल्याने राजकीय पक्षांच्या प्रचारावर परिणाम झाला. मात्र, तरीदेखील काहींनी प्रचार सुरू ठेवला होता.

भोसरी ‘एमआयडीसी’ त पाणी
जोरदार पावसामुळे भोसरी ‘एमआयडीसी’मध्ये तळे साचल्याचा अनुभव आला. ‘एमआयडीसी’च्या टी ब्लॉक आणि आजूबाजूच्या ब्लॉक परिसरामध्ये अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे कामगारांची, उद्योजकांची आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची तारांबळ उडाली.
फोटो ः १८८९०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com