कवितांच्या गावात वन्स मोअरचा गजर   
‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची दाद

कवितांच्या गावात वन्स मोअरचा गजर ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची दाद

पिंपरी, ता. ११ ः स्पृहा जोशी हिने सादर केलेल्या ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ या बालगीताला मिळालेला वन्स मोअर, संकर्षण कऱ्हाडे यांच्या ‘आमचं तुमच्याकडे लक्ष आहे ’ या राजकीय कवितेला मिळालेली दाद, ज्येष्ठ नागरिकांना स्टेजवर बोलावून त्यांच्यासह सादर केलेली प्रेम कविता अशा वातावरणात शुक्रवारी (ता. १०) सकाळ नाट्य महोत्सवाचा प्रारंभ झाला. या महोत्सवार्तंगत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ या कवितांच्या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या महोत्सवाचे सहप्रायोजक असणाऱ्या ऑक्सिकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. शेखर घाटगे, सुरभी ग्रुपचे संचालक प्रमोद नरसाळे आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते कार्यक्रमातील कलाकारांचा सन्मान करण्यात आला. फरांदे स्पेसेसचे व्यवस्थापकीय संचालक अनिल फरांदे यांच्या हस्ते डॉ. शेखर घाडगे यांना तर ‘सकाळ मुंबई’ चे युनिट हेड उमेश पिंगळे यांच्या हस्ते प्रमोद नरसाळे यांना सन्मानित करण्यात आले.
‘संकर्षण व्हाया स्पृहा’ च्या ७१ व्या प्रयोगाला पिंपरी चिंचवडकरांनी हाऊस फुल्ल प्रतिसाद दिला. गोविंदस्वामी आखरे यांची ‘रखुमाई रुसली, कोपऱ्यात बसली’ ही पारंपारिक रचना स्पृहा यांनी सादर केली. तर संकर्षण यांनी सादर केलेली ‘पंढरीच्या विठुराया’ ही वारीवरील कविता उपस्थितांना भावूक करून गेली. तर कोरोनावर सादर केलेल्या कवितेने प्रेक्षकांना खळखळून हसविले.

नाट्य महोत्सवाचा समारोप रविवारी (ता. १२) भाऊ कदम यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘करून गेलो गाव’ या नाटकाने होणार आहे. या नाट्य महोत्सवासाठी ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. ‘बुक माय शो’ आणि ‘तिकिटालय’ यावर तिकिटे उपलब्ध आहेत. महोत्सवाचे सहप्रायोजक चिंचवड येथील ऑक्सिकेअर हॉस्पिटल आणि सोमाटणे येथील सुरभी सिटी हे आहेत. तर बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड हे फायनान्स पार्टनर आहेत.

तिकिटांचे दर (प्रतिव्यक्ती)

प्रतिनाटक तिकीट (तळमजला) ः ४०० रुपये
प्रतिनाटक तिकीट (बाल्कनी) ः ३०० रुपये

नाट्य बुकिंगसाठी...
ऑनलाइन बुकिंग ः https://in.bookmyshow.com; www.ticketalay.com/ticketalay app
फोन बुकिंग ः ८९७५२३७०४१
अधिक माहितीसाठी संपर्क ः सचिन ः ९७३०९५९६९९


फोटोः १९१२०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com