जानकीदेवी आगरवाल यांचे निधन

जानकीदेवी आगरवाल यांचे निधन

पिंपरी, ता. ११ ः जानकीदेवी (मामी) हरिचंद्र आगरवाल (वय ८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.
गेली अनेक वर्षे त्यांनी घोरावडेश्वर देवस्थानात सेवाभावीवृतीने समाजकार्य केले आहे. भाविकांना स्वखर्चातून त्या अन्नदान, महाप्रसाद, पाणी वाटप करत. भाविकांची सेवा शुश्रूषा करण्यात कायम त्यांचा पुढाकार होता. धार्मिक व आध्यात्मिक कार्यासाठी त्या सढळ हाताने मदत करत. देहूगावात पवन-मावळ नावाने धर्मशाळा बांधली तर आळंदीत विविध मंदिर व धर्मशाळांसाठी बोअरवेल खोदून त्यांच्या पाण्याची चिंता मिटविली होती. बांधकाम व्यावसायिक व क्रिसाला डेव्हलपर्सचे संस्थापक संचालक ओमप्रकाश आगरवाल यांच्या त्या मातुः श्री तर क्रिसाला डेव्हलपर्सचे संचालक विशाल अगरवाल, आकाश आगरवाल व सागर आगरवाल यांच्या त्या आजी होत.
फोटो ः 19124

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com