पवन मावळातील पावसाने फुलशेतीचे नुकसान

पवन मावळातील पावसाने फुलशेतीचे नुकसान

सोमाटणे, ता.१२ ः ढगांचा गडगडाट, विजेच्या लखलखाटासह पवन मावळात शनिवारी सुमारे दोन तास जोरदार पाऊस पडला. त्याने फुलशेती, बाजरी पिकांचे नुकसान झाले. पावसाने रात्री उघडीप दिली.
आकाशात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ढगांनी गर्दी केली. सात वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट, विजेच्या लखलखाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. साडेसात वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर आणखी वाढला दोन तास जोरदार पाऊस पडला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पावसाने उघडीप दिली. पावसाने उकाडा कमी होऊन हवेत गारवा निर्माण झाला. ऐन बाजारभाव चांगले असतानाच गहुंजे येथील शेतकऱ्यांची तोडणीला आलेली फुले भिजून नुकसान झाले. वादळी वारा, जोरदार पावसाने काढणीला आलेली व काढणी केलेल्या बाजरीचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांचा काढणी केलेला कांदा शेतातच भिजला. हा पाऊस ऊस, भुईमुगास उपयुक्त ठरला आहे.
गहुंजे येथील शेतकरी संजूकुमार बोडके म्हणाले,‘‘या पावसाने फुलशेती व बाजरी पिकाचे नुकसान झाले.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com