गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

तरुणाला तिघांकडून बेदम मारहाण

पिंपरी : आम्हाला उलटे का बोलतो ? असे म्हणत तिघांनी तरुणाला लाथाबुक्क्या आणि कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली. तसेच पोलिसात तक्रार केल्यास खून करण्याची धमकी दिल्याची घटना दापोडी येथे घडली.
अबू बखर खान (वय २०, रा. एसएमएस कॉलनी, दापोडी, मूळ- मलकापूर, बुलढाणा) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नावे आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मुनीर शेख (वय २६), कामिल उर्फ इश्यू खान (वय २१, दोघेही रा. एसएमएस कॉलनी, दापोडी), मुजफ्फर उर्फ मूज्जू कुरेशी (वय २०, रा. पवार वस्ती, दापोडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादीला कमरेच्या बेल्टने हातावर, पोटावर, मानेवर मारहाण करून जखमी केले. दरम्यान, आरोपी मुनीर याने ‘तू जर आमची पोलिसात तक्रार दिली; तर, तुझा मर्डर करीन’, अशी धमकी दिली.

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू
हिंजवडी : भरधाव टँकरने दिलेल्या धडकेत ओम सारंग गाडीवान (वय २१, रा. कोकाटे वस्ती, बावधन) या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बावधन येथील जुन्या जकात नाक्याजवळ घडली.
या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी टँकर चालक बाळू दत्तू चव्हाण (वय ४२, रा. शेंदुरजना, आडोरा, ता. मानोरा, जि. वाशीम) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कोकाटे वस्ती बावधन येथून चांदणी चौकाकडे येत असताना जुन्या जकात नाक्याजवळ पाठीमागून येणाऱ्या भरधाव टँकरने दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये दुचाकी चालक ओम यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

तरुणाला मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा
पिंपरी : खुर्ची अंगाला का लावली ? या कारणावरून तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना पिंपरीतील मोरवाडी येथे घडली.
आर्यन विलास साळुंखे (वय २१, रा. शिवदर्शन कॉलनी, मोहननगर, चिंचवड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी अभिषेक आनंद शिंगे (वय २१), रोहन काळू शिंगे (वय २२), केतन आनंद शिंगे (वय १८), योगेश (वय २४, सर्व रा. खराळवाडी, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी दांडक्याने, गट्टूने तसेच हाताने मारहाण करून शिवीगाळ केली, फिर्यादीच्या वाहनाचे नुकसान केले.

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जितेशकुमार धर्मेंद्र यादव यांचा मृत्यू झाला. ही घटना निघोजे येथे स्मशान भूमीसमोरील रस्यावर घडली. याप्रकरणी अनिलकुमार ज्ञानू वर्मा (रा. निघोजे) यांनी फिर्याद दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com