भोसरी मतदारसंघातील 
मतदान यंत्रणेची तयारी पूर्ण

भोसरी मतदारसंघातील मतदान यंत्रणेची तयारी पूर्ण

पिंपरी, ता. १२ ः शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. तेथील ४६८ मतदान केंद्रांना मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वितरण रविवारी (ता. १२) घरकुल चिखली येथील ईडब्ल्यूएस टाऊन हॉल येथून केले, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी दिली.
भोसरी विधानसभा मतदारसंघात सोमवारी (ता. १३) सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत होणार आहे. निवडणूक साहित्याचे वाटप करण्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली होती. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व साहित्य जमा करून घेतले जाणार आहे. ते स्वीकृतीचे कामही चिखली घरकुल येथील टाऊन हॉल येथे होणार आहे. दरम्यान, रविवारी मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप करण्यात आले. दुपारी दोनपर्यंत सर्व मतदान केंद्र प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर साहित्य घेऊन रवाना झाले होते. मतदान साहित्यामध्ये ईव्हीएम (बॅलेट युनिट), कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य व मतदान प्रक्रियेविषयीचे विविध पाकिटे आणि लिफाफे आदींचा समावेश होता.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदार
मतदार / संख्या
पुरुष / ३,०२,०७५
महिला / २,४९,४१६
तृतीयपंथी / ९१
एकूण / ५,५१,५८२

दृष्टिक्षेपात भोसरी विधानसभा मतदारसंघ
मतदान केंद्र / ४६८
केंद्र अधिकारी (बीएलओ) / ४६८
मतदान अधिकारी/कर्मचारी / २,७७४
पोलिस बंदोबस्त / ४६८
मतदान ठिकाणे / ७८
सेक्टर ऑफिसर / ५७
मास्टर ट्रेनर / ४०

दृष्टिक्षेपात भोसरी विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्र
युवा संचलित ः केंद्र क्रमांक २२८, मॉडर्न हायस्कूल, निगडी
महिला संचलित ः केंद्र क्रमांक २८६, झेप पुनर्वसन केंद्र, मासुळकर कॉलनी, पिंपरी
आदर्श केंद्र ः क्रमांक २६७, स्टर्लिंग स्कूल, इंद्रायणीनगर, भोसरी
दिव्यांग संचलित ः आयआयबीएम कॉलेज, चिखली

भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये ४६८ मतदान केंद्र आहेत. मतदान यंत्र, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्रांचे १९६ संच राखीव आहेत. मतदान प्रक्रियेसाठी दोन हजार ७७४ अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक पोलिस कर्मचारी नियुक्त केले आहेत. शिवाय, प्रत्येक केंद्राच्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात असेल.
- रेवणनाथ लबडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, भोसरी विधानसभा
--

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com