ऑनलाइन फसवणुकीप्रकरणी एकजण अटकेत

ऑनलाइन फसवणुकीप्रकरणी एकजण अटकेत

पिंपरी, ता. १२ : अर्धवेळ ऑनलाइन काम देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलच्या पथकाने मीरा भाईंदर येथून जेरबंद केले.
जैद जाकीर खान (वय २०, रा. मीरा भाईंदर) असे आरोपीचे नाव आहे. या फसवणूकप्रकरणी एका व्यक्तीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे. दरम्यान, अर्धवेळ कामाचा सल्ला देण्यासाठी आरोपीने फिर्यादीला संपर्क साधला. फिर्यादीला व्हॉट्सअपवर लिंक पाठवून ती लिंक ओपन करून त्यातील टास्क लाईक आणि शेअर करण्यास सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला पाचशे रुपये गुंतवणूक करून त्यांना त्या बदल्यात साडेसहा हजार रुपये परतावा दिला. त्यानंतर, फिर्यादीला अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या खात्यांवर ३२ लाख ९२ हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली. त्याच्या खात्यावर मोठ्या रकमांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com