आकर्षक सजावटीने सजले युवा केंद्र

आकर्षक सजावटीने सजले युवा केंद्र

पिंपरी, ता. १३ : मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारात काढलेल्या सुंदर रांगोळीतून मतदान करण्याचा संदेश, फुलांची, फुग्यांची आकर्षक सजावट, निळे कार्पेट तसेच केंद्राध्यक्षासह इतर कर्मचारीही युवा असे चित्र नवी सांगवीतील बाबुरावजी घोलप विद्यालयातील मतदान केंद्रात होते. निवडणूक विभागाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय युवा संचलित मतदान केंद्र निश्चित केले होते. त्यापैकी चिंचवड विधानसभा मतदार संघातील हे केंद्र बाबुरावजी घोलप विद्यालयात होते.
या केंद्रात केंद्रात प्रवेश करताच कार्पेट टाकलेले होते. यासह सुंदर रांगोळी काढून त्यामध्ये मतदान देशासाठी, लोकशाहीच्या प्रबळतेसाठी, अशा प्रकारचे मतदान करण्याबाबतचे तसेच लोकशाहीबाबतचे संदेश देण्यात आले होते. दरवाजावर फुग्यांची व फुलांची सजावट केली होती. या केंद्रात सेक्टर ऑफिसर चेतन देसले, केंद्राध्यक्ष ज्ञानेश्वर चिमटे, मतदान अधिकारी श्वेता शिंदे, देवेश्वर ओहोळ, रामेश्वर बागडे व मदतनीस आकाश कांबळे व पोलिस कर्मचारी दीपक आलुरे हे सर्वच युवा अधिकारी, कर्मचारी होते. तसेच या केंद्रात मतदान करणाऱ्यांमध्येही युवा मतदारांची संख्याही अधिक होती.
या केंद्राप्रमाणेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातील युवा संचलित मतदान केंद्र पिंपरी कॅम्पातील मघनमल उधाराम कॉमर्स कॉलेज येथे तर मावळ मतदार संघातील युवा संचलित मतदान केंद्र वडगाव येथील रमेशकुमार सहाणे इंग्लिश मीडियम स्कूल येथे होते. येथेही सर्व अधिकारी, कर्मचारी युवा होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com