गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

मारहाण प्रकरणी एकाला अटक

चऱ्होली : चौघांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी एकाला अटक केली. ही घटना दिघी पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर घडली.
या प्रकरणी जनार्दन भास्कर भुंबे (रा. अण्णाभाऊ साठेनगर, स्वारगेट) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ऋषिकेश छगन घोडके (वय ३०, रा. वडमुखवाडी, ता. हवेली, जि. पुणे) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या आईवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी, त्यांची बहिण आणि चुलती हे पोलिस ठाण्यातून घरी जात असताना फिर्यादीच्या बहिणीचा पती ऋषिकेश घोडके व त्याची आई यांनी अचानकपणे फिर्यादीच्या अंगावर धावून येत शिवीगाळ केली. गाडीची चावी फिर्यादीच्या बरगडीत भोसकली. तसेच फिर्यादी, चुलत बहीण व चुलती यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले.

पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी सुमीत शैलेंद्र गाडे (वय २३, रा. तापकीर चौक, काळेवाडी) याला अटक केली. ही कारवाई वाकड येथे करण्यात आली.
गाडे याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी जगताप डेअरी ते कस्पटे चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल व दोन हजार रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस जप्त केले. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी
हिंजवडी : भरधाव डंपरच्या धडकेत सूर्यकांत नारायण भांडवलकर (वय ३९, रा. अनंतनगर, हिंजवडी) हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना हिंजवडी येथे घडली.
भांडवलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे कस्तुरी चौकाकडून हिंजवडीकडे येत असताना पाठीमागून भरधाव डंपर आला. डंपरने पाठीमागून जोरात फिर्यादीच्या दुचाकीला धडक दिल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचेही नुकसान केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com