ज्येष्ठांनी उत्साहात बजावला मतदानाचा हक्क
व्हीलचेअरवर बसून, थरथरत्या हातांनी राष्ट्रीय कर्तव्यावर उमटवली मोहोर

ज्येष्ठांनी उत्साहात बजावला मतदानाचा हक्क व्हीलचेअरवर बसून, थरथरत्या हातांनी राष्ट्रीय कर्तव्यावर उमटवली मोहोर

पिंपरी, ता.१३ ः लोकसभा निवडणुकीच्या मतदान वाढीसाठी प्रशासनाकडून केलेल्या आवाहनाला ज्येष्ठ नागरिकांनी प्रतिसाद देत सकाळच्या सुमारास मतदान केंद्र गाठले. अनेक ज्येष्ठांना दहा पावले चालणेदेखील शक्य होत नव्हते. मात्र, तरीदेखील मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचा उत्साह त्यांच्यात दिसून येत होता. त्यांना पाहून तरुणांनादेखील प्रेरणा मिळत होती.
चिंचवड - भोईरनगर जयवंत प्राथमिक शाळेत मोहनलाल पृथ्वीराज मथुरिया या ९८ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक दुचाकीवर बसून, नातेवाइकांसह मतदानासाठी पोहोचले. त्यांचे हात थरथरत होते. मात्र जिद्द कायम होती. मतदान केंद्राच्या आत त्यांना व्हीलचेअरवर नेण्यात आले. एम्पायर इस्टेटमधील ज्येष्ठ नागरिक मन्मथ गवसने (वय ९७ ) यांनी आपल्या मुलासोबत जिद्दीने जाऊन मतदान केले. अध्यक्ष रामदास माळी, सहकोषाध्यक्ष सुयश कुलकर्णी उपस्थित होते. प्रत्येक नागरिकाने आपला अधिकार बजावलाच पाहिजे. यातूनच लोकशाही समृद्ध होईल. उन्हाची पर्वा न करता नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी नातवाला सेल्फी काढायला लावून, ती नातेवाईक व ओळखीच्या लोकांना पाठवत मतदान करण्यास सांगितले.
गणेश नगर -नवी सांगवीच्या मालती जोशी (वय ९२) यांनी मतदान केले. नवमहाराष्ट्र विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एस. एन. पाटील यांनी वयाच्या नव्वदीनंतर मतदान केले. साई चौक, नवी सांगवी येथील विठ्ठल गणपत वांजळे (वय ९०) , समतानगर, नवी सांगवी येथील निर्मला विभुते (वय ८५) यांनी मतदान केले. कृष्णानगर -नवी सांगवीमधील प्रभावती इंगोले (वय ९०) तर रामनगर पिंपळे गुरव येथील एकनाथ खडूस ( वय ९०) यांनी मतदान केले. आदर्शनगर नवी सांगवीमधील ज्ञानोबा थिटे (वय ८९ ), इंदूबाई ज्ञानोबा थिटे (वय ८०) आणि समता नगर नवी सांगवीतील शकुंतलाबाई सुपे ( वय ६८) आणि गणेश नगर -नवी सांगवीच्या मालती जोशी (वय ९२) यांनी मतदान केले.


नीमोडिया दाम्पत्याने बजावला हक्क
ज्येष्ठ नागरिक गणेश भगवानदास नीमोडिया (वय ७३) व प्रभा नीमोडिया (वय ७१) यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. डांगे चौकातील प्रेरणा शाळेत त्यांनी हा हक्क बजावला. मतदानानंतर आपल्याला आत्मिक समाधान मिळाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

फोटोः 19769, 19771, 19772, 19773, 19775, 19777, 19778, 19779, 19780, 19781.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com