कर्जतमध्ये मतदानावर पावसाचे विघ्न
ग्रामीण भागात मतदारांमध्ये उत्साह, भर उन्हातही मतदान

कर्जतमध्ये मतदानावर पावसाचे विघ्न ग्रामीण भागात मतदारांमध्ये उत्साह, भर उन्हातही मतदान

नेरळ, ता. १३ ः कर्जत तालुक्यात दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे मतदार अडकून पडला. दरम्यान, पावसाच्या विघ्नामुळे मतदानाच्या टक्क्यांवर परिणाम झाला.
आज सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. शहरी भागात साधारण अकरानंतर तुरळक मतदार दिसत होते. त्यानंतर उन्हाचा तडाखा बसत असला तरी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती. तालुक्यातील कर्जत दहिवली, कशेळे, धामोते, नेरळ दहिवली, कोठिंबे आदी भागात दुपारी मतदारांची गर्दी झाली होती तर धामोते, कर्जत दहिवली येथील मतदानकेंद्रावरील ईव्हीएम मशिन बंद पडण्याचा प्रकार वगळता बाकी ठिकाणी मतदान सुरळीत पार पडले. तसेच नेरळ येथील आनंदवाडी केंद्रावर दिव्यांगासाठी विशेष केंद्र तयार करण्यात आले होते.
दुपारी साडेतीनच्या सुमारास अवकाळी पावसाने कर्जत तालुक्याला झोडपून काढले. त्यामुळे ऊन कमी झाल्यावर बाहेर पडण्यासाठी थांबलेला मतदार अडकून पडला.

ज्येष्ठ दांपत्याने बजावला हक्क

कमळू रामा आगीवले (वय ९५) आणि भागीबाई कमळू आगीवले (वय ८५) यांनी फणसवाडीवरून भर पावसात पायी चालत नेरळजवळील आनंदवाडी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. हे ज्येष्ठ जोडपे म्हणजे आजच्या पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे, असे मत नेरळ-22 चे क्षेत्रीय अधिकारी डॉ. रवींद्र मर्दाने यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे हे केंद्र दिव्यांग अधिकारी व कर्मचारी यांनी अत्यंत गांभीर्याने यशस्वीपणे चालविले. या मतदान केंद्रात मतदान केंद्राध्यक्ष कैलास घोडके, नितीन भानवसे, रमेश संकपाळ, जनार्दन पानमंद, प्रभाकर कर्णूक आदी दिव्यांगांचा समावेश होता.
फोटो ः १९७४४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com