पैसे वाटपाच्या अफवेने कार्यकर्त्यांची दमछाक

पैसे वाटपाच्या अफवेने कार्यकर्त्यांची दमछाक

पिंपरी, ता. १३ : लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. त्यासाठी शहरातील प्रभागनिहाय वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या बुथवर उमेदवारासह कार्यकर्ते धावपळ करत होते. त्यामुळे त्यांची दिवसभर चांगलीच दमछाक झाली. पैसे वाटपाच्या दिवसभर अफवा सुरू राहिल्याने कार्यकर्ते त्याठिकाणी धावाधाव करीत होते. शहरातील बहुतांश वॉर्डांमध्ये मतदानासाठी नागरिकांनी पाचनंतर गर्दी केली होती. ज्येष्ठ नागरिकांना काही वॉर्डांमध्ये कार्यकर्त्यांकडून रिक्षा उपलब्ध करून दिली जात होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी रिक्षाने येऊन मतदानाचा हक्क बजावत होते.

मतदारांमध्ये संभ्रम
मतदारांना दोन हजार रुपये मतदानासाठी मिळणार, दुपारी तीन वाजता तीन हजार व सायंकाळी चार वाजता पाच हजार रुपये होणार, अशा अफवा दिवसभर पसरत राहिल्या. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रिक्षावाल्यास १२०० ते बूथ प्रतिनिधीला ५०० रुपये रोज
‘लक्ष्मीदर्शन’च्या अफवेने नागरिक मतदानासाठी थांबल्याची चर्चा होती. दुपारी उशिरापर्यंत मतदान कमी झाले असल्याने उमेदवार मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करीत होते. त्यासाठी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहचविणे आणि परत घरी आणून सोडणे असा अनावश्यक भुर्दंडही अनेक उमेदवारांना बसला. त्यासाठी रिक्षाचालकांना एक हजार ते बाराशे रुपये तर बूथ प्रतिनिधीला पाचशे रुपयांप्रमाणे रोजगार मिळाला.

मजुरांनी घरीच राहणे केले पसंत
मतदानासाठी सुटी होती, परंतु खासगी व्यावसायिकांनीदेखील दुकाने बंद ठेवली होती. या बद्दल किरकोळ दुकानदारांशी संपर्क साधला असता, आम्ही मजुराला तीनशे रुपये रोज देतो. आज मतदान असल्याने लक्ष्मीदर्शन रोजंदारीपेक्षा अधिक असल्याने मजुरांनी घरीच राहणे पसंत केले, असे व्यावसायिकांनी सांगितले. तसेच अनेक ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांच्या मतदानासाठी सुट्टी दिली नव्हती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com