आदर्श मतदान केंद्राची मतदारांना भूरळ 
विविध सुविधांचा समावेश केल्याने मतदारांची गैरसोय दूर

आदर्श मतदान केंद्राची मतदारांना भूरळ विविध सुविधांचा समावेश केल्याने मतदारांची गैरसोय दूर

पिंपरी, ता. १३ : मावळ लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात उभारण्यात आलेल्‍या आदर्श मतदार केंद्राची मतदारांना भूरळ पडली होती. दिव्‍यांग, महिला, नवमतदार, हरित केंद्रांमुळे मतदारांची गैरसोय दूर झाली होती.
निवडणूक आयोगाच्यावतीने मावळ लोकसभा मतदार संघामध्ये प्रत्‍येक विधानसभा निहाय महिला, युवा, नवमतदारांसह संस्‍कृती जोपासणाऱ्या ३४ आदर्श मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली. आवश्‍यक सुविधांचा त्‍यामध्ये समावेश करण्यात आला होता. चिंचवड विधानसभेतील रावेत येथील सिटी प्राईड शाळेत हे केंद्र उभारण्यात आले. पिंपरी विधानसभेत दापोडी येथील गणेश इंग्लिश मीडियम स्‍कूल येथे मतदान केंद्र उभारण्यात आले होते. या ठिकाणी प्रवेशद्वाराबाहेर रांगोळी काढण्यात आली होती. गुलाबी रंगांची खोली उभारण्यात आली होती. मावळ विधानसभेत लोणावळा येथील ऑक्‍सिलियम कॉन्‍हेंट हायस्‍कूल या ठिकाणी देखील हे केंद्र उभारण्यात आले होते. तसेच पनवेल, उरण आणि कर्जतमध्ये प्रत्‍येकी एक केंद्र उभारण्यात आले होते.
आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून शहरात महापालिकेच्या उद्यान विभागाच्यावतीने नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धन विषयक संदेशाचा प्रचार व्हावा, यासाठी चार हरित मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत. उद्यान विभागाचे उप आयुक्त रविकिरण घोडके तसेच सहाय्यक उद्यान अधीक्षक राजेश वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी २४२ आयुर्वेदिक वनस्पतीं, नक्षत्र वाटिका आणि आयुर्वेदिक औषधी वृक्ष यांची माहिती देणारे फलक तसेच मतदान झाल्यानंतर पर्यावरणाचा संदेश प्रदर्शित करणारे आकर्षक सेल्फी पॉइंट लावण्यात आले आहेत. आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते मतदान करणाऱ्या मतदारांना वृक्षरोपांचे व बिजांचे वाटप करण्यात आले. यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, अण्णा बोदडे तसेच निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

पर्यावरण संर्वधनाचा संदेश देण्यासाठी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून आणि अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके यांनी विविध मतदान केंद्र हे हरित मतदान केंद्र म्हणून तयार केली होती. पिंपरी चिंचवड शहरातील पीके इंटरनॅशनल स्कूल पिंपळे सौदागर, एनसीआरडी स्टर्लिंग स्कूल भोसरी, ज्ञानप्रबोधिनी शाळा निगडी, डीवाय पाटील ज्युनिअर कॉलेज, शाहूनगर येथे असलेल्या मतदान केंद्रावर संकल्पित हरित चार मतदान केंद्र साकारण्यात आली. या उपक्रमामध्ये नक्षत्र वाटिका, १४२ आयुर्वेदिक वनस्पती, देशी वृक्षांच्या बीजांचे वाटप, मतदारांना प्रोत्साहन पूरक रोपांचे वाटप करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com