ऊन पावसाच्या खेळात मतदानाचा टक्का घसरला
पनवेल विधानसभा मतदारसंघ

ऊन पावसाच्या खेळात मतदानाचा टक्का घसरला पनवेल विधानसभा मतदारसंघ

पनवेल, ता. १३ ः पनवेल विधानसभा मतदार संघात दुपारी कडक ऊन तर सायंकाळी मुसळधार पाऊस पडल्याने त्याचा परिणाम मतदानावर झाला. त्यामुळे मतदारसंघातील मतदानाचा टक्का घसरला.
आज सकाळी सातपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारी एकपर्यंत २६.९३ टक्के मतदान झाले. तीनपर्यंत मतदानाची टक्केवारी ३४.९३ टक्के इतकी होती. तर सांयकाळी पाचपर्यंत अवघे ४२.२४ टक्के मतदान झाले होते.
उन्हाची तीव्रता अधिक असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर मतदारांनी सकाळच्या टप्प्यात मतदानासाठी गर्दी केली होती. तसेच शहरी भागातही याचवेळी गर्दी होती. प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक असलेल्या मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. उन्हाचा पारा अधिक असल्याने बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी सकाळी अकरापर्यंत मतदानासाठी गर्दी केली होती.
कळंबोलीमधील सुधागड, खारघर वसाहतीमधील गोखले हायस्कूलमधील मतदान केंद्रासह पनवेल शहरातील हिरवे गुरुजी शाळेतील मतदान केंद्रात सकाळी सातपासून नागरिक रांगा लावून मतदान करत होते. मतदान केंद्राबाहेर ज्येष्ठांना आणि दिव्यांगांना मतदान केंद्रातील मतपेटीपर्यंत सहज जाता यावे, यासाठी विशेष यंत्रणा सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नेमले होते. कोठेही अनुचित प्रकार घडलेला नसल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण झाली.

मोबाईलच्या उजेडात मतदान
----------------------------
वादळी पावसामुळे तलोजा औद्योगिक वसाहत भागात झाड कोसळल्याने पनवेल तालुक्यातील जवळपास २० गावातील वीजपुरवठा खंडित झाला. त्याचा फटका मतदानाला बसला. दुपारी तीनपर्यंत ऊन व चारच्या सुमारास सुरू झालेल्या वादळी वारे व पावसामुळे ग्रामीण भागातील शाळेत सुरू असलेल्या मतदान केंद्रावर वीज गेल्याने अंधार पसरला होता. जो मोबाईल मतदान केंद्रावर घेऊन जाण्यास मनाई होती, त्याच केंद्रात मोबाईलच्या टॉर्च वर मतदान करण्याची वेळ मतदारांवर आली. तसेच अंधारात मतदान करण्यास अडथळा झाल्याने दोन - अडीच तास ताटकळत मतदारांना उभे राहावे लागले. अनेकजण मतदान न करता परत गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com