वाचक लिहीतात

वाचक लिहीतात

सायबर सुरक्षा शिक्षण अनिवार्य करणे गरजेचे
डिजिटल युगात ऑनलाइन फसवणूक, बनावट मेलद्वारे व्यक्तींची बदनामी करणे, असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. राजकीय क्षेत्रात ही डीप फेक व्हिडिओ तयार होत आहेत. या सर्व प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी सायबर सुरक्षा शिक्षण प्रत्येक क्षेत्रात अनिवार्य करणे काळाची गरज बनली आहे. अनेक औद्योगिक क्षेत्रात संगणक संबंधित ऑनलाइन गुन्हे घडल्यास बनावट मेल बाहेरून आल्यास पुढे काय करायचे याचे ज्ञान सुशिक्षित लोकांना देखील नाही. बदनामीच्या भीतीने सायबर क्राईम झाल्यास दुर्लक्ष करण्यास प्राधान्य दिले जाते. नवीन पिढीने याबाबत योग्य ते ज्ञान घेऊन तसेच, सायबर क्राईमबाबत पोलिसांनी सर्वसामान्य लोकांमध्ये जागरूकता वाढवून प्रबोधन करणे गरजेचे आहे. या सायबर धोक्यांना आपण प्रतिबंध करू शकतो.
- राजेश जाधव, रुपीनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com