वाढीव वीज बिलाचा नागरिकांना ‘शॉक’

वाढीव वीज बिलाचा नागरिकांना ‘शॉक’

पिंपरी, ता. १४ : ‘महावितरण’ने लागू केलेल्‍या नवीन दरानुसार शहरातील वीज ग्राहकांना वीज बिल आले आहे. उन्‍हाळ्‍यात वातानुकूलित यंत्रणांचा वाढता वाढल्‍याने देखील वीज ग्राहकांना अधिकचे बिल आले आहे. त्‍यावर नागरिक संतप्‍त प्रतिक्रिया व्‍यक्‍त करत असून, इतके बिल भरायचे कसे? असा प्रश्न नागरिक उपस्‍थित करत आहेत.

‘महावितरण’ने आपल्‍या वीज बिल दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वीज बिल दर एक एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत. ‘महावितरण’च्‍या निर्णयामुळे नागरिकांच्‍या खिशाला कात्री बसणार आहे. त्‍यामध्येच वाढत्‍या उन्‍हाळ्याचा चटका वीज बिलातही भर घालणारा ठरत आहे. मागच्‍या वर्षी उन्‍हाळ्यात ३८ अंश डिग्री सेल्‍सिअसपर्यंत तापमानात वाढ झाली होती. सध्या ही वाढ ४२ अंश डिग्री सेल्‍सिअसपर्यंत गेली आहे. त्‍यामुळे नागरिकांकडून वातानुकूलित यंत्रणांचा वापर देखील वाढला आहे. त्‍याचा परिणाम वाढीव वीज बिलात दिसत आहे.

शहरात नागरिकांना नेहमीप्रमाणे येणाऱ्या बिलात सहाशे रुपयांपासून हजार ते दीड हजार रुपयांचे वाढीव वीज बिल आले आहे. शहरातील नागरिक यावर तीव्र संताप व्‍यक्‍त करत आहेत. वाढत्‍या उन्‍हामुळे एसी, कुलरचा वापर वाढला आहे. त्‍यासाठी अधिक वीज खेचली जात आहे. फ्रिज अधिक वेळा उघडल्‍यास त्‍यासाठी देखील वीज अधिक खर्च होत असल्‍याचे ‘महावितरण’कडून सांगण्यात येत आहे.

युनिट वापरानुसार आकारले जाणारे दर
युनिट ः पूर्वीचा दर ः सध्याचा दर
१०० पर्यंत ः ४.४१ पैसे ः४.७१ पैसे
१०१ ते ३०० पर्यंत ः ९.६४ पैसे ः १०.२९ पैसे
३०१ ते ५०० पर्यंत ः १३. ६१ पैसे ः १४.५५ पैसे
५०० युनिट पुढील ः १५.५७ पैसे ः १६.६४ पैसे

‘‘गेल्‍या महिन्‍यात आलेल्‍या वीज बिलापेक्षा या महिन्‍यात चारशे रुपये अधिक वाढीव वीज बिल आले आहे. मागील महिन्‍यात आठशे रुपये वीज बिल होते. या महिन्‍यात एक हजार दोनशे रुपये आले आहे. सर्वसामान्‍य नागरिकांना हा आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
- संतोष शिंदे, नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com