शहरातील अंगणवाड्यांच्या वेळेत बदल

शहरातील अंगणवाड्यांच्या वेळेत बदल

पिंपरी, ता.१४ ः राज्यासह शहरात उन्हाचा तडाखा वाढला असला तरी बालकांना सकाळी १० ते १२ या वेळेत अंगणवाडीत यावेच लागते. त्यामुळे, वाढत्या उन्हाचा फटका बालकांना बसू नये, यासाठी एकात्मिक बालविकास विभागाने अंगणवाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. परिणामी, बालकांना पोषण आहार देण्याची वेळ आता सकाळी आठ ते सकाळी साडेदहा अशी करण्यात आली आहे.
शहराचा तापमानाचा पारा ४३ अंशाच्या पुढे गेला आहे. उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी लागल्याने अंगणवाडीतील चिमुकल्यांनाही सुट्टीचे वेध लागेल आहेत. पण, पोषण आहाराच्यानिमित्ताने त्यांना अंगणवाडीत बोलावण्यात येत असल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर आहे. महिला व बाल कल्याण विभागाने अंगणवाडीच्या वेळेत बदल करण्याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, अंगणवाडीच्या वेळा निश्चित केल्या आहेत. अंगणवाडीचे कामकाज सकाळी ८ ते १२ यावेळेत असेल. बालकांना पोषण आहार देण्याची वेळ सकाळी आठ ते सकाळी साडेदहा अशी करण्यात आली आहे.

चिमुकल्यांनाही उन्हाळी सुट्टी हवी
अंगणवाडीतील सहा वर्षे वयोगटातील बालके पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी येतात. प्राथमिक व माध्यमिक शाळांना उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे सुट्टी लागल्याने पालक अंगणवाडीच्या बालकांना सहसा पाठवत नाहीत. सकाळपासून उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने चिमुकल्यांना उन्हाचा त्रास होईल काय? याचे सतत दडपण अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर राहते. मोठ्या विद्यार्थ्यांप्रमाणे चिमुकल्यांनाही उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करावी. सुट्टीच्या कालावधीसाठी अंगणवाडीतून कोरडा शिधावाटप करावे, अशी मागणीही पुढे येत आहे.

प्रशासनाकडून सुट्ट्यांचे नियोजन
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना प्रत्येकी १५ दिवसांची सुट्टी मिळेल. दोघांनी नियोजन करून पहिल्या व दुसऱ्या पंधरवड्यात कोणी सुट्टी घ्यायची ? हे निश्चित करावे. तसेच ज्या अंगणवाडीत मदतनीस नाही. तेथील सेविकाच दोन्ही पदभार सांभाळत आहेत. त्या सेविकेस सुट्टी घेताना त्या लगतच्या दुसऱ्या सेविकेकडे त्या अंगणवाडीचा अतिरिक्त पदभार सोपवून सुट्टी घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

अंगणवाड्यांना एक महिन्याची सुटी हवी
प्राथमिक, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा अंगणवाडीत सहा वर्षांखालील बालके असल्याने उन्हाळ्याची एक महिन्याची सुट्टी अंगणवाडीला लागू करावी, अशी मागणी पालक कमला कांबळे यांनी केली आहे. सुट्टीत कोरडा शिधा देण्याचे त्यांनी सुचवले आहे.

‘‘उन्हाच्या चटक्यापासून वाचवण्यासाठी अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या वेळेत बदल झाला आहे. या बालकांना शासनाच्या नियमानुसार, ३०० दिवस सकस आहाराचे वाटप करावे लागते.’’
- शैलजा चौधरी, अध्यक्षा, अंगणवाडी कर्मचारी सभा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com