दोन गटांत वाद; परस्परविरोधी गुन्हे दाखल

दोन गटांत वाद; परस्परविरोधी गुन्हे दाखल

पिंपरी, ता. १४ : भांडणावरून दोन गटांत वाद झाल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
तळेगाव दाभाडे येथील ३१ वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे घरी असताना एका महिला आरोपीशी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपी फिर्यादीच्या घरात शिरले. फिर्यादीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. घरातील साहित्याचे नुकसान केले. तर १९ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. एका आरोपी तरुणाचे फिर्यादीशी भांडण झाले होते. त्यामुळे, फिर्यादी व तिचे नातेवाईक फिर्यादीच्या घरी गेले. भांडणावरून समजावत असताना आरोपीने शिवीगाळ करून धमकी देत फिर्यादीशी अश्लील वर्तन केले. फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून धमकी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com